|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पालिकेने रंगवलेल्या भिंती झाल्या काळय़ा

पालिकेने रंगवलेल्या भिंती झाल्या काळय़ा 

प्रतिनिधी/ सातारा

पालिकेने स्वच्छता मोहिमेंतर्गत शहरातील भिंती रंगवण्याचे नुकतेच काम केले आहे. नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी भिंतीवर चित्र तसेच लेखी स्वरूपात संदेश दिले आहेत. शहरात जागोजागी कचरा होवू नये, म्हणून लिटील डस्टबीन देखील उभारण्यात आल्या आहेत.

पालिकेने शहर स्वच्छ रहावे म्हणून लाखो रूपये खर्च करून विविध योजना राबवल्या आहेत. जागोजागी लिटल डस्टबीन तसेच कचराकुंडय़ा उभारण्यात आल्या आहेत. या कचरा कुंडय़ांमध्ये कचरा न टाकताच तो इतर ठिकाणी टाकला जात  आहे. तसेच तो कचरा नष्ट करण्यासाठी त्या परिसरातील नागरिक तो कचरा त्याच ठिकाणी जाळत आहे. यामुळे पालिकेने रंगवलेल्या †िभंती काळय़ा होवू लागल्या आहेत. पोवईनाका येथील पोस्ट ऑफिसच्या जवळ परिसरातील नागरिक या ठिकाणी कचरा आणून टाकत आहेत. यामुळे याठिकाणी कचऱयाचा ढीग साठत असल्याने तो कचरा येथील नागरिकांकडून जाळून टकला जात असल्याने भिंती काळय़ा होवू लागल्या आहेत.