|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » येत्या अधिवेशनात अपंग व पुनर्वसन मंञ्यावर हक्कभंगाचा गुन्हा दाखल करणार आ. गोरे

येत्या अधिवेशनात अपंग व पुनर्वसन मंञ्यावर हक्कभंगाचा गुन्हा दाखल करणार आ. गोरे 

प्रतिनिधी/ म्हसवड

या शब्दा ऐवजी दिव्यांग हा शब्द करून अपंगाचे प्रश्न सुटणार नाहीत अपंगांना  त्याच्या प्रश्नासाठी आंदोलन करावे लागते हि सरकारला लाजिरवाणी गोष्ट आहे भाजपा सरकारने अपंगाच्या प्रलंबित मागण्यांसाठी सकारात्मक निर्णय न घेतल्यास येत्या अधिवेशनात मंञ्यावर हक्कभंगा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्याचा इशारा आ. जयकुमार गोरे यांनी म्हसवड येथील अपंगाच्या मेळाव्यात दिला 

म्हसवड येथे तृप्ती मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय अपंग विकास महासंघ व  माण तालुका अपंग संघ आणि  माण तालुका राष्ट्रीय काँग्रेस युथ यांच्या संयुक्त विद्यमाने अपंगाचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यास माण तालुक्याच्या तहसीलदार सुरेखा माने  अपंग महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय जगताप माण पंचायत समिती सदस्य चंद्राबाई आटपाडकर नगरसेवक अकिल काझी माजी नगराध्यक्ष विजय धट सुरेश म्हेञे मोहन पाटील सुनिल माने डॉ सागर सावंत निलेश काटे पंकज पोळ सुरेश इंगवले अमिन आगा आदी मान्यवर उपस्थित होते 

यावेळी आ. गोरे म्हणाले राज्यात 22 लाख कुटूंबात एक व्यक्ती अपंग आहे त्याचे प्रश्न समस्या     हि गंभीर असताना सरकार त्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पहात नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे सरकारने अपंगाना अपंगा म्हणण्या ऐवजी यापुढे दिव्यांग असे म्हणण्याचे परिपञक काढले म्हणजे त्यांच्या समस्या त्याचे प्रश्न सुटले असे होत नाही त्यासाठी सरकारने अपंगाच्या कल्याणासाठी व त्याना स्वताच्या पायावर उभे राहुन   त्याचे कुटूंब कसे जगेल असे  उद्दोग सुरू करण्यासाठी  सवलतीची तरतुद करावी त्याच प्रमाणे त्याच्या अन्य मागण्याचा विचार लवकरात लवकर करावा अन्यथा येत्या अधिवेशनात अपंग व पुनर्वसन मंञ्यावर हक्क भंगाचा ठराव आणण्यासाठी पक्षा प्रयत्न केला जाईल असे सांगून आ. गोरे पुढे म्हणाले अपंगाना उद्योग व्यवसायासाठी कर्ज काढताना बॅका त्रास देतात अपंगाना 21 हजार अट असलेल्या उत्पन्नाच्या दाखल्याची वाढवण्यात यावी अपंगाचे प्रमाणपञ तालुक्याच्या ठिकाणी मिळावे  अपंग विकास महामंडळावर अपंगच अधिकारी नेमावा यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे आ. गोरे म्हणाले 

यावेळी तहसीलदार सुरेखा माने म्हणाल्या मी हि अपंग आहे माञ मी कधी ही मागे हटली नाही जिद्दीने प्रत्येक संकंटाला सामोर जात प्रश्नाची सोडवणूक केली अपंग आहे म्हणून घरात बसले नाही मी अपंग असल्याची जाणीव मला प्राथमिक शिक्षण घेत असताना पळण्याच्या शर्यतीत झाली घरच्याच्या पाठबळावर दहावीत अपंगात मेरिट मध्ये राज्यात पहिली आलेली अपंग मुलगी मी आज तुमच्या समोर उभी आहे ती फक्त जिद्द चिकाटीच्या जोरावर प्रत्येक संकटाचा सामना करण्यास प्रत्येक अपंग बांधवानी व भगिनींनी करावा शासन प्रत्येक अपंगाला 3ज्ञ्  निधी देत त्याचा उपयोग लघु व  कुटीर उद्योगासाठी करून स्वताच्या पायावर उभे राहुन हिम्मतीने जिवनात पुढे जावून वेगळा आदर्श निर्माण करा माझ्या आखतारितील अपंगाच्या समस्या पैकी 21 हजाराच्या उत्पन्नाच्या दाखल्याची अडचन येवू देणार नाही अंत्योदय योजनेचा अपंगाला न्याय मिळवून देवून त्याच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे तहसीलदार माने म्हणाल्या 

प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप प्रजोलन करण्यात येवून पञकाराचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला 

या कार्यक्रमास विक्रम शेंडगे विकास खिलारी नागेश खांडेकर आदी शेकडो अपंग बांधव व महिला मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते 

Related posts: