|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » महालक्ष्मी सरस प्रदर्शनात सातार्याच्या स्टॉलवर खरेदीसाठी गर्दी

महालक्ष्मी सरस प्रदर्शनात सातार्याच्या स्टॉलवर खरेदीसाठी गर्दी 

प्रतिनिधी/ सातारा

नाबार्ड मुंबईच्यावीतीने मुंबई येथील बीकेसी एमएमआरडीएच्या भव्य मैदानावर भरवण्यात आलेल्या महसालक्ष्मी सरस 2018 या महिला बचत गटांसाठीच्या प्रदर्शनात राजमाता श्रीमंत छ. सुमित्राराजे भोसले बहुउद्देशीर स्वयं. महिला बचत गट फेडरेशनच्या स्टॉलवर सातार्यातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. या प्रदर्शनात सातार्याच्या स्टॉलवर 61 प्रकारच्या विविध वस्तू आणि माल विक्रीसाठी ठेवण्यात आला असून दि. 17 ते 25 जानेवारी या कालावधीत चालणार्या या प्रदर्शनात फेडरेशच्या स्टॉलवर चांगली आर्थिक उलाढाल होणार असल्याने महिला बचत गटांचा उत्साह वाढला आहे. 

            राजमाता श्रीमंत छ. सुमित्राराजे भोसले बहुउद्देशीर स्वयं. महिला बचत गट फेडरेशनमार्फत बचत गटांचा उत्पादित माल देशातील विविध शहरातील हजारो ग्राहकांपर्यत पोहचवण्याचा निर्धार फेडरेशनच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी नुकताच जाहिर केला होता. त्यानुसार डिसेंबर महिन्यात पुणे येथे झालेल्या भिमथडी यात्रेत सौ. वेदांतिकाराजे यांच्या मार्गदर्शनाखाली सातार्यातील महिला बचत गटांच्या वस्तू आणि माल विक्रीसाठी फेडरेशनमार्फत स्टॉल लावण्यात आला होता. याठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर सौ. वेदांतिकाराजे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील महालक्ष्मी सरस या बचत गटा प्रदर्शनातही फेडरेशनचा स्टॉल लावण्यात आला आहे. या प्रदर्शनात नाबाईच्या सहकार्यामुळे मोफत स्टॉल मिळाला आहे. या प्रदर्शनात 500 स्टॉल्स आहेत. त्यामध्ये सातार्याच्या बचत गट फेडरेशच्या वैविध्यपुर्ण स्टॉलवर खास करुन गर्दी वहोत आहे. या स्टॉलवर सेंद्रीय गुळ, चिकू, आवळा, छोटी टोपली, खुराडी, परडी, उभा ग्लास, बाजरी पिठ, इंद्रायणी तांदूळ, घेवडा डाळ, तांदूळ पिठ, झेंडू माळ, विविध प्रकारचे सेंट आदी 61 प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. 

            महालक्ष्मी सरस या प्रदर्शनाला प्रत्येक दिवशी लाखो लोक भेट देत आहेत. या प्रदर्शनात विविध खाद्य पदार्थ आणि वस्तूंच्या स्टॉल्सची रेलचेल पहायला मिळत आहे. सातार्यातील महिला बचत गटांसाठीच्या स्टॉलवर असंख्य ग्राहक गर्दी करुन मनमुराद खरेदी करत आहेत. यामुळे फेडरेशनचा बचत गटाच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचा उद्देश खर्या अर्थाने सफल झाला असून यापुढे देशभरातील प्रत्येक प्रदर्शनात सातार्यातील महिला बचत गटांची उत्पादने फेडरेशन पोहचवेल, असे सौ. वेदांतिकाराजे यांनी यानिमीत्ताने स्पष्ट केले आहे. दरम्यान, महिला सक्षमीकरणाचा उद्देश डोळ्यासमारे ठेवून नाबार्डने महालक्ष्मी सरस यासारखे दर्जेदार प्रदर्शन भरवून सातार्यातील बचत गट फेडरेशनसाठी मोफत स्टॉल उपलब्ध करुन दिला आणि सातार्यातील महिला बचत गटांचा माल त्यामुळे मुंबईतील ग्राहकांपर्यंत पोहचवता आला, याबद्दल सौ. वेदांतिकाराजे यांनी नाबार्डचे आभार मानले. 

            नाबार्ड आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने महिला बचत गटांना विविध वस्तू उत्पादीत करण्याचे प्रशिक्षण आणि लघू उद्योग स्थापन्यासाठी प्रोत्साहन देण्यात ये आहे. याचा लाभ सातारा जिह्यातील महिला बचत गटांनी घ्यावा. बचत गटांच्या मालाला विविध प्रदर्शनात ग्राहकांपर्यंत पोहचवण्याची संधी फेडरेशनने उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे जिह्यातील जास्तीत जास्त महिला बचत गटांनी फेडरेशनशी संपर्क साधुन हक्काची मिळवावी, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी केले. 

चौकट……….कर्तव्य बचत बझारवर गर्दी….

 राजमाता श्रीमंत छ. सुमित्राराजे भोसले बहुउद्देशीर स्वयं. महिला बचत गट फेडरेशनमार्फत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जात आहे. फेडरेशनने सातारा येथील गोल मारुती मंदीर चौक, यादोगोपाळ पेठ येथे कर्तव्य बचत बझार नावाने महिला बचत गट उत्पादित मालाच्या विक्रीसाठी आऊटलेट सुरु केले आहे. या आऊटलेटवर असंख्य महिला बचत गटांच्या सर्वप्रकारच्या वस्तू आणि माल विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. याठिकाणीही ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे

Related posts: