|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजपच्या निर्णयाचे मगोकडून जोरदार स्वागत

भाजपच्या निर्णयाचे मगोकडून जोरदार स्वागत 

प्रतिनिधी/ पणजी

मगो पक्षाने भाजपच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. साबांखामंत्री सुदिन ढवळीकर यांनी म्हटले आहे की, साऱया गोमंतकीय जनतेचा ज्याला पाठिंबा होता व आहे, तोच योग्य निर्णय भाजपने घेतला आहे.

गोव्यात आता आम्ही झुवारी नदीच्या काठावर पडिक शेतामध्ये रॉक गार्डन स्थापन करणार आहोत. त्यात गोमंतकीय पद्धतीचे सारे काही पहायला मिळेल. या उद्यानाला डॉ. टी. बी. कुन्हा व राम मनोहर लोहिया या गोवामुक्तिसाठी लढलेल्या विरांची नावे देण्यात येईल. 2 लाख चौ. मी. जमीन या प्रकल्पाकरीता ताब्यात घेण्यात येईल.

गोव्याच्या इतिहासाचे दर्शन घडणार

या उद्यानाला येणाऱया सर्वांनाच गोव्याचा संपूर्ण इतिहास पाहता येईल. जनमत कौलासाठी ज्यांनी पुढाकार घेतला, प्रयत्न केला, गोवा मुक्तीसाठी पुढाकार घेतला त्या सर्वांचीच माहिती सचित्र या रॉक गार्डनमध्ये उभी केली जाईल. इंदिरा गांधी, पंडित नेहरु आणि पुरुषोत्तम काकोडकर इत्यादींची माहितीही रॉक गार्डनमध्ये दाखविली जाईल.

नव्या युवकांना गोवा समजेल

याशिवाय गोव्यातील मंदिरे, चर्चेस व फोंडय़ातील जामा माशिद यांच्या प्रतिकृती या उद्यानात उभारल्या जातील. हे उद्यान पाहिल्यानंतर नवोदित युवकांना गोव्याचा सारा इतिहास समजला पाहिजे याची दखल घेतली जाईल. राज्यात येणाऱया सर्वच पर्यटकांना येथून मिनी गोव्याचे दर्शन होईल व गोव्याचा इतिहास, संस्कृती या सर्वांची माहिती होईल.

या ठिकाणी गोमंतकीयांना तसेच पर्यटकांना खास गोमंतकीय पद्धतीचे जेवण प्राप्त होईल. तशी व्यवस्था केली जाणार आहे, असे मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले. हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 

Related posts: