|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » घरकुल प्रदर्शन दरवर्षी मोठय़ा प्रमाणात व्हावे!

घरकुल प्रदर्शन दरवर्षी मोठय़ा प्रमाणात व्हावे! 

प्रतिनिधी/ बेळगाव

पोलिओ निर्मूलनासाठी रोटरी क्लबचे कार्य हे सेवाभावी असून त्यासाठी इतरांनीही योगदान द्यावे. घरकुल प्रदर्शनाची लोकप्रियता पाहता हे प्रदर्शन दर दोनवर्षांऐवजी दरवर्षी मोठय़ा प्रमाणात व्हावे, असे प्रतिपादन रोटरियन अविनाश पोतदार यांनी केले.

मराठा मंदिर येथे आयोजित घरकुल प्रदर्शन 2018 च्या सांगता समारंभात प्रमुख अतिथी या नात्याने अविनाश पोतदार बोलत होते. याप्रसंगी रोटरी क्लब वेणूग्रामचे अध्यक्ष डॉ. राहुल साठे, कन्सल्टींग सिव्हिल इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मुदनूर, तरुण भारतचे सीएमओ उदय खाडीलकर, इव्हेंट चेअरमन अरविंद खडबडी, राजेश तळेगाव आदी उपस्थित होते. रोटरी क्लब वेणूग्राम, कन्सल्टींग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन व तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या 8 व्या घरकुल 2018 प्रदर्शनाची मंगळवारी सांगता झाली. 

सांगता समारंभात बोलताना रोटरियन अविनाश पोतदार म्हणाले, तिन्ही संघटनांनी मिळून हे प्रदर्शन यशस्वीपणे भरवलेले आहे. ते स्तुत्य असेच आहे. तरुण भारतचा हा उत्तम असा उपक्रम आहे.

स्वागतपर भाषणात बोलताना रोटरियन डॉ. राहुल साठे म्हणाले, घरकुल प्रदर्शनाला मिळालेला प्रतिसाद पाहता गेले 4 महिने घेतलेल्या परिश्रमाचे तिन्ही संघटनांचे सार्थक झाले आहे. तिन्ही संघटनांनी एकत्ररित्या हे प्रदर्शन यशस्वी केले आहे.

तरुण भारतचे सीएमओ उदय खाडीलकर यावेळी म्हणाले, हे प्रदर्शन प्रेरणादायी ठरावे असेच ठरले आहे. यासाठी तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांचे मार्गदर्शन व कार्यकारी संचालक प्रसाद ठाकुर यांचे प्रोत्साहन लाभत आहे. स्टॉलधारकांनी समाधान व्यक्त केल्यामुळे घरकुल प्रदर्शनाने याही वर्षी अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.

यावेळी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष मनोहर वाटवे, अरुण कामुले, हेमेंद्र पोरवाल, अभिजीत शहा, डी. बी. पाटील, महेश अनगोळकर तसेच इंजिनिअर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष विनय बेहरे, रोटरीचे प्रांतपाल आनंद कुलकर्णी, मल्लिकार्जुन मुदनूर, उमेश सरनोबत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

प्रदर्शनासाठी योगदान दिलेल्या तरुण भारतच्या टीममधील सोहन पाटील, सुहास देशपांडे, अरुण दैवज्ञ, संदीप जोग, निरंजन पाटील, अमित असलकर यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. गोगटे बीबीएच्या व्हॉल्युंटर्सना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

उत्कृष्ट स्टॉलची घोषणा

प्रदर्शनातील उत्कृष्ट स्टॉलची घोषणा यावेळी करण्यात आली. लघु, मध्यम व मोठा स्टॉल अशा गटात तीन विजेते जाहीर करण्यात आले.

छोटा स्टॉल – प्रथम अजंठा साइन्स, द्वितीय जग्वार, तृत्तीय पृथ्वी असोसिएट्स.

मध्यम स्टॉल – प्रथम सुप्रीम इंडस्ट्रीज लि., द्वितीय-इलीज स्वीचेस, तृत्तीय-गणेश टेडर्स.

मोठा स्टॉल – प्रथम-विशाल इन्फ्राबिल्ड, द्वितीय- एस. जे इंडस्ट्रीज, तृत्तीय-श्रीराम हार्डवेअर.

या स्टॉल विजेत्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. स्टॉलधारकांच्यावतीने एम. बी. क्रिएशन्सच्या मोनिका बागेवाडी, श्रीराम हार्डवेअरचे हंगीरगेकर, सुप्रीम इंडस्ट्रीजचे नितीन शेटय़े, टाटा सिस्टमचे रोहित रॉय या सर्वांनी घरकुल प्रदर्शनात सहभाग घेतल्याने सार्थक झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. अरविंद खडबडी यांनी आभार मानले.