|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ग्रामीण भागातील कला जतन करा

ग्रामीण भागातील कला जतन करा 

   प्रतिनिधी/   चिकोडी

ग्रामीण भागात लोककला टिकविण्यासाठी यात्रा किंवा धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकाने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आपली भाषा, संस्कृती टिकविण्यासाठी त्या लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. त्यासाठी विविध संघटनांनी पुढाकार घेऊन अर्थिक मदत करण्याची गरज आहे. तरच ग्रामीण संस्कृती टिकू शकते, असे प्रतिपादन आमदार गणेश हुक्केरी यांनी केले.

धुळगनवाडी येथे रंगदर्शन ग्रामीण विकास संघ, कन्नड व संस्कृती खाते बेंगळूर यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्मदेव मंदिर कळसारोहण व यात्रा कार्यक्रमात आयोजित लोकगीते कलांचे सादरीकरण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बसवमल्लिकार्जुन स्वामीजी म्हणाले, लोकगीतातून देशाची संस्कृती दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. संस्कृतीच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल चिकोडीचे शिवलिंग हंजे, धुळगनवाडीचे तातण्णा खोत, विजापूर येथील हिंदूस्थान संगीत कलाकार वीणा धिटे, गदग येथील कस्तुरी उप्पार, निपाणीचे मारुती कोन्नूरे यांचा सिरीगन्नड शिरोमणी पुरस्काराने गौरव करण्यात आला.

यावेळी साहित्यिक एस. वाय. हंजे यांनी मनोगत व्यक्त केले. मंचावर शिवकुमार कमते, सिद्धप्पा खोत, रावसाब चिमणे, दिलीप मगदूम, एस. एम. पुराणीकमठ, रावसाहेब कमते उपस्थित होते. यावेळी आयोजित मिरवणुकीला कौशल्य विभाग निगमचे अध्यक्ष शिवकुमार कमते व रमेश कमते यांनी चालना दिली. कुंभमेळ्य़ासहीत विविध वाद्ये तसेच विविध कलांचे सादरीकरण, संगीत सादरकरणाने ग्रामस्थांची मने जिंकली.

Related posts: