|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दिल्लीत संचलनासाठी तेजस सावंतची निवड

दिल्लीत संचलनासाठी तेजस सावंतची निवड 

प्रतिनिधी / सावंतवाडी:

येथील पंचम खेमराज महाविद्यालयाचा बी. कॉम. चा द्वितीय वर्षाचा नेव्ही एन. सी. सी. कॅडेट तेजस संतोष सावंत याची प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथे होणाऱया परेडसाठी निवड झाली आहे. सिंधुदुर्गातून निवड झालेला तो एकमेव विद्यार्थी आहे.

तेजस हा कलंबिस्तचा सुपुत्र आहे. त्याने कलंबिस्त हायस्कूलमध्ये आठवी ते दहावीत असतांना नेव्ही एनसीसीमध्ये सहभाग घेतला होता. पदवीचे शिक्षण पंचम खेमराज महाविद्यालयात बी. कॉम. शाखेत घेत आहे. पंचम खेमराज महाविद्यालयात गेली दोन वर्षे नेव्ही एन. सी. सी. कॅडेट म्हणून तो कार्यरत आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, अहमदनगर या ठिकाणी बेस्ट कॅडेट म्हणून त्याची निवड झाली. महाराष्ट्र नेव्ही एन. सी. सी. बेस्ट कॅडेट म्हणून प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱया एनसीसी परेडसाठी त्याची निवड झाली आहे. तेजस याला महाविद्यालयाचे एनसीसी शिक्षक विशाल अपराज याचे मार्गदर्शन लाभले.