सेव्हिलाची ऍटलेटिको माद्रिदवर मात

वृत्तसंस्था/ सेव्हिला
किंग्स चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील परतीच्या लढतीत सेव्हिलाने ऍटलेटिको माद्रिदचा 3-1 असा पराभव करून त्यांचे आव्हान संपुष्टात आणले. सेव्हिलाने दोन टप्प्याची ही लढत 5-2 अशा फरकाने जिंकली.
सेव्हिलाने 23 व्या सेकंदालाच पहिले यश मिळविले. फुलबॅक सर्जिओ एस्क्मयुडेरोने बचावातील त्रुटीचा लाभ उठवत हा गोल केला. त्यानंतर एव्हर बेनेगाने पेनल्टीवर दुसरा आणि पाब्लो साराबियाने अखेरच्या टप्प्यात तिसरा गोल नोंदवून विजय निश्चित केला. 13 व्या मिनिटाला अँटॉइन ग्रीझमनने ऍटलेटिकोचा एकमेव गोल नोंदवला. याशिवाय त्याने मारलेले फटके दोनदा बारवरून बाहर गेले. 2013 मध्ये किंग्स चषक स्पर्धा जिंकलेल्या ऍटलेटिकोला आता युरोपा लीगवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. चॅम्पियन्स लीगमध्येही त्याला पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली होती.
Related posts:
Posted in: क्रिडा