|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » लिंगायत महामोर्चास निपाणी मराठा समाजाचा पाठिंबा

लिंगायत महामोर्चास निपाणी मराठा समाजाचा पाठिंबा 

प्रतिनिधी /निपाणी :

कोल्हापुरात 28 रोजी स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या महामोर्चास सकल मराठा समाज कल्याण संस्थेतर्फे पाठिंबा देण्यात आला. लिंगायत स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी आयोजित महामोर्चा समाजाच्या प्रगतीसाठी योग्य असल्याचे मत सुधाकर सोनाळकर यांनी व्यक्त केले.

यावेळी पाठिंब्याचे पत्र लिंगायत समाजाचे बी. आर. पाटील, ऍड. यशवंत संकपाळ, सुनील नेजे, पुष्कर तारळे, प्रकाश बाडकर, वज्रकांत सदलगे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. यावेळी ऍड. संकपाळ म्हणाले, महात्मा बसवेश्वरांनी वैदिक धर्माचा अत्याचार झुगारून लिंगायत धर्म स्थापन केला. ही परंपरा राजर्षि शाहू महाराजांनी पुढे चालवली. म्हणून लिंगायत व मराठा समाजाने एकत्र राहून आपल्या मागण्या सरकारकडून पूर्ण करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.

याप्रसंगी निपाणी ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेश कदम, टाऊन प्लॅनिंग कमिटी अध्यक्ष बाळासाहेब देसाई सरकार, नगरसेवक रवींद्र शिंदे, संजय सांगावकर, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, जयवंत भाटले, हरिष देसाई, रोहन साळवे, सुधीर माळवे, शीतल भाटले, रवी नेसरे, रवी कोरगावकर, बी. बी. सातवार यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.