|Thursday, April 18, 2019
You are here: Home » विविधा » मुंबईत 2017मध्ये 3हजार प्रवासी ट्रॅकवर ठार

मुंबईत 2017मध्ये 3हजार प्रवासी ट्रॅकवर ठार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेल्या मुंबईची लोकल ही नागरिकांसाठी लाइफलाइन नाहीतर अदिक धोक्याची झाली आहे. कारण 2017 या वर्षात तब्बल 3 हजार 14 प्रवाशांना रेल्वे ट्रॅकवर त्यांचा प्राण गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली आहे. सरकारी रेल्वे पोलीस यांनी दिलेल्या माहितीनुसार 3014 प्रवाशांनी 2017 या वर्षात प्राण गमावले.

विविध रेल्वे अपघातांमध्ये हे मृत्यू झाले आहेत. आरटीआय कार्यकर्ते समीर जव्हेरी यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळण्यासाठी या संदर्भातला अर्ज केला होता. त्याला उत्तर देतानाच 2017 या वर्षात 3014 प्रवाशांना विविध अपघातात प्राण गमवावे लागल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे.

 

 

 

 

Related posts: