|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » नायर रुग्णालय प्रकरण; तिघांवर गुन्हा दाखल

नायर रुग्णालय प्रकरण; तिघांवर गुन्हा दाखल 

आमदार लोढांच्या धरणे आंदोलनानंतर कार्यवाहीला गती

ऑनलाईन टीम / मुंबई

  मुंबईच्या नायर रुग्णालयात आपल्या नातेवाईकाला पहायला गेलेल्या तरुणाचा रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला. त्यानंतर मृत राजेशला न्याय मिळवून देण्यासाठी त्याच्या कुटुंबियांसह आमदार लोढां यांनी डीनच्या केबिनमध्ये धरणे आंदोलन केले.

 

  दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने तिघांवर निलंबनाची कार्यवाही करून गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये डॉक्टर, वार्डबॉय, व एका महिला कर्मचाऱयाचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी मृत तरूणाच्या कुटुंबियांना तात्काळ पाच लाख रूपयाची मदत जाहीर केली आहे.