धुक्यामुळे तलावात कोसळली स्कॉर्पिओ, 7 जण ठार

अलीगढः
उत्तरप्रदेशच्या अतरौलीमध्ये दाट धुक्यामुळे रविवारी स्कॉर्पिओ तलावात कोसळली आहे. या दुर्घटनेत वाहनातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये छापेमारी करून परतणाऱया दोन पोलीस कर्मचाऱयांचा देखील समावेश आहे. वाहन पलटल्याने त्यातून कोणालाही बाहेर पडता न आल्याचे सांगण्यात आले. सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या काही जणांनी दुर्घटनेची माहिती पोलिसांना दिली. दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस पथक क्रेन आणि रुग्ण्वाहिकेसोबत घटनास्थळी पोहोचले. तलावात कोसळलेले वाहन बाहेर काढण्यात आले असता 7 जणांचे मृतदेह आढळून आले. मृतांमध्ये दोन पोलीस कर्मचारी, 4 प्रवासी आणि चालकाचा समावेश आहे. तर राजस्थानच्या भरतपूरमध्ये देखील दाट धुक्यामुळे ट्रक आणि बोलेरोची धडक झाली. या दुर्घटनेत अलवरच्या गोवर्धन परिक्रमेसाठी मथुरा येथे जात असलेल्या 4 भाविकांचा मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाले आहेत.