|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » प्रश्न सुटत नसतील तर बैठक हवी कशाला?

प्रश्न सुटत नसतील तर बैठक हवी कशाला? 

दक्षता समिती बैठकीत आमदार राणेंचा सवाल

प्रतिनिधी / वैभववाडी:

वैभववाडी तालुका दक्षता समितीच्या सभेमध्ये घेतलेल्या ठरावाची दखल वरि÷ कार्यालयाकडून घेतली जात नाही. ठरावाची अंमलबजावणी होणार नसेल तर या समितीचा उपयोग काय?. याबाबत वैभववाडी दक्षता समितीने जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन चर्चा करण्याचा निर्णय सभेत एकमताने घेण्यात आला. याबाबत आपण विधानसभेतही आवाज उठवणार आहोत, असे
प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी केले.

वैभववाडी तालुका दक्षता समिती सभा आमदार राणे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालयात झाली. यावेळी तहसीलदार संतोष जाधव, पुरवठा अधिकारी स्वप्नील प्रभू, सदस्य सदानंद रावराणे, अनंत फोडके, अनंत जाधव, सोनाली  लोके, सुवर्णा रावराणे,  श्रीराम शिंगरे आदी उपस्थित होते.

 शासनाने रेशन दुकानावर ई-पॉस मशिनची सक्ती केली आहे.  परंतु ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे.  त्यामुळे ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीचा वापर करावा, अशी सूचना आमदार राणे यांनी केली.

दक्षता समितीच्या सभेमध्ये या अगोदर अनेक ठराव, सूचना करण्यात आले.  मात्र, यातील एकाही ठरावाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक सभेत तेच ते विषय पुन्हा-पुन्हा चर्चेत येतात. मात्र, कोणताही प्रश्न सुटत नाही. मग या सभा व हे सोपस्कर कशासाठी? समिती अध्यक्ष व सदस्यपदे काय समाधानासाठी आहेत का?  याबाबत आपण जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन चर्चा करुया, असे आमदार राणे यांनी सूचवले. त्याला सर्व सदस्यांनी होकार दिला. याबाबत आपण विधानसभेतही आवाज उठवणार आहोत, असे राणे म्हणाले.

तालुक्मयातील आधारकेंद्रे बंद आहेत. त्यामुळे जनतेची गैरसोय होत आहे.  ही सुविधा सुरू करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. रेशनिंग कार्डला स्लीप जोडण्यासाठी कार्डधारकांना वैभववाडी येथे यावे लागत आहे. यासाठी रेशन दुकानावर ही स्लीप उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सदस्य श्रीराम शिंगरे यांनी केली. या पुढील दक्षता समिती सभेला तालुक्मयातील ग्रामदक्षता समिती सदस्यांनाही बोलवा. आपण एकत्रीत बैठक घेऊ, अशी सूचना केली.