|Saturday, April 20, 2019
You are here: Home » क्रिडा » जयदेव उनादकट सर्वात महागडा भारतीय

जयदेव उनादकट सर्वात महागडा भारतीय 

आयपीएल लिलाव : अँड्रय़ू टाय, गेल पंजाबकडे, संदीप लामिछाने आयपीएलमधील पहिला नेपाळी

वृत्तसंस्था/ बेंगळूर

आयपीएल खेळाडूंच्या लिलावाच्या दुसऱया दिवशी भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनादकटला 11.5 कोटीची जबरदस्त किंमत मिळाली असून राजस्थान रॉयल्सने त्याला खरेदी केले आहे तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज अँड्रय़ू टायला किंग्स इलेव्हन पंजाबने 7.2 कोटी रुपयांना मिळविले आहे.

उनादकट व टाय यांना मोठय़ा रकमेचा आनंद मिळाला तर 17 वषीय संदीप लामिछानेने इतिहास घडविताना आयपीएल लिलावात खरेदी करण्यात आलेला नेपाळ पहिलाच क्रिकेटपटू बनला आहे. त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 20 लाख रुपयांस खरेदी केले आहे. पहिल्या दिवशी लेगस्पिनर रशिद खानला 9 कोटीची किंमत मिळाल्यानंतर दुसऱया दिवशी अफगाणचा आणखी एक स्पिनर 16 वषीय मुजीब झद्रनला किंग्स इलेव्हन पंजाबने 4 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले आहे. अव्वल स्तरावर त्याने याआधीच खेळ केला असून सध्या तो यू-19 विश्वचषकात खेळत आहे. त्याचाच संघसहकारी झहीर खानला राजस्थान रॉयल्सने 60 लाखाला खरेदी केले आहे.

किंग्स इलेव्हन पंजाब व राजस्थान रॉयल्स यांनी केवळ एका खेळाडूला आपल्याकडे कायम ठेवल्याने या लिलावात सर्वाधिक रक्कम या संघांनी खर्च केली आहे. आरआरने दुसऱया दिवशीही मोठा खर्च केला असून पंजाब इलेव्हनही फारसा मागे नव्हता. आरआरने कर्नाटकाचा ऑफस्पिनर कृष्णाप्पा गौतमला 6.2 कोटी रुपयास आपल्या ताफ्यात घेतले आहे.

आतापर्यंतच्या लिलावात उनादकट हा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला असून 1.5 कोटी ही किमान किंमत असताना त्याला 11.5 कोटीला खरेदी करण्यात आले. त्याला घेण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्स, पंजाब इलेव्हन यांच्यात चुरस लागली होती. पण आरआरने शेवटी बाजी मारली. उनादकट टी-20 स्पेशालिस्ट असल्याने त्याला घेण्यासाठी चढाओढ लागली होती. याशिवाय आरआरने या वषीच्या लिलावात पहिल्या दिवशी इंग्लंडच्या बेन स्टोक्सला 12.5 कोटी या सर्वाधिक बोलीला खरेदी केले आहे. के. गौतमला 20 लाखाची किमान किंमत होती. पण त्याच्या 31 पट रकमेला त्याला खरेदी करण्यात आले.

सर्वच संघांनी भारतीय खेळाडू खरेदी करण्यावर भर दिला होता. गोलंदाज अष्टपैलू वाशिंग्टन सुंदरला आरसीबीने 3.2 कोटीला, पंजाबचा पेसर संदीप शर्माला सनरायजर्स हैदराबादने 3 कोटीला, मोहित शर्माला पंजाब इलेव्हनने 2.4 कोटीला, झारखंडचा स्पिनर शाहबाज नदीमला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 3.2 कोटीला, मोहम्मद सिराजला आरसीबीने 2.6 कोटीला खरेदी केले. केकेआरने दुसऱया दिवशीही नवोदित खेळाडूंना घेण्यावर भर दिला. त्यांनी यू-19 संघातील शिवम मावीला 3 कोटीला खरेदी केले. पहिल्या दिवशी त्यांनी कमलेश नागरकोटी व शुभम गिल यांनी घेतले आहे. दक्षिण आफ्रिकेचा नवोदित वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीला चेन्नई सुपरकिंग्सने खरेदी केले. त्याची किमान किंमत 50 लाख रुपये होती. विंडीजचा ख्रिस गेल यावेळी किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना दिसेल. त्याला 2 कोटी रुपये या किमान किमतीवर पंजाबने खरेदी केले. राजस्थान रॉयल्सने लंकेच्या दुश्मंता चमीराला 50 लाखाला, नमन ओझाला डीडीने 1.5 कोटीला, पार्थिव पटेलला आरसीबीने 1.7 कोटीला, मुरली विजयला 2 कोटीला सीएसकेने, चेन्नई सुपरकिंग्सने मार्क वुडला 1.5 कोटीला, मिशेल जॉन्सनला केकेआरने 2 कोटी या किमान किमतीला खरेदी केले.

डेल स्टीन, इयॉन मॉर्गन, कोरी अँडरसन, हाशिम आमला, मार्श, हेल्स, लियॉन, ईश सोधी या आंतरराष्ट्रीय खेळाडूंची मात्र दुसऱया दिवशीही खरेदी होऊ शकली नाही.

 

Related posts: