|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » नंदवाळचा रखडलेला निधी देवून सर्व सेवा मार्गी लावणार

नंदवाळचा रखडलेला निधी देवून सर्व सेवा मार्गी लावणार 

वार्ताहर/ सडोली खालसा

  नंदवाळ येथील विठ्ठल मंदीर प्रतिपंढरपुर म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदीर ब वर्ग तिर्थक्षत्र आराखाडय़ात असल्याने रखडलेला निधी लवकरच देऊन मंदीराच्या सर्व सेवासुविधा वारकरी सांप्रदयासाठी पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी केले.

  नंदवाळ (ता. करवीर) येथील माघ वारी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्माई मंदीरा च्यावतीने मुर्तीसाठी करण्यात आलेली प्रभावळ लोकार्पणसोहळा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अस्मिता कांबळे होत्या.

   ते म्हणाले, या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. या मंदिरात सेवा सुविधासाठी आमदार चंद्रदीप नरके यानी गेली सात वर्ष विधानसभेत या निधीसाठी मागणी केल्याने विकासाला गती मिळाली आहे तसेच उर्वरीत सर्व कामासाठी लवकरच निधीची तरतूद करून मंदीराच्या सर्व सेवा सुविधा पुर्ण करणार असल्याचे सांगितले.

  आमदार चंद्रदीप नरके म्हणाले प्रतिपंढरपूर नंदवाळ हे क वर्गातून ब वर्गात मंजुर करून घेऊन येथील सेवा सुविधासाठी गेली सात वर्ष पाठपुरावा करत मंदिर विकासाची कामे सुरू आहेत पण अजून याठिकाणची बरीच कामे अपूर्ण असून त्यासाठी जिह्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येत्या आषाढीपर्यंत जास्ती जास्त निधी मंजुर करून येथील संपूर्णसेवा सुविधा पुर्ण कराव्यात अशी मागणी पालकमंत्री यांचेकडे केली. स्वागत प्रास्ताविक बाळकृष्ण पाटील यांनी केले.

     मंदीर समितीने तयार केलेली विठ्ठल रुक्माई मंदीरासाठी प्रभावळ पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रदिप नरके, सरपंच अस्मिता कांबळे याचे हस्ते लोकार्पण करण्यात आली.

  यावेळी हंबीरराव पाटील, नामदेव पाटील, उपसरपंच सागर पाटील, ग्रा. प. सदस्य पांडुरंग पाटील, सागर गुरव, परशराम कांबळे, लता शिंदे, अस्मिता पाटील, आनंदी उलपे, नंदा काकते, जोती पाटील, तानाजी निकम, विनायक उलपे, महेश वरूटे, नामदेव पाटील.