|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कागलच्या विकासासाठी 1 कोटींचा निधी उपलब्ध करुन देणार

कागलच्या विकासासाठी 1 कोटींचा निधी उपलब्ध करुन देणार 

प्रतिनिधी/ कागल

कागल शहरामध्ये गेल्या काही वर्षात मोठय़ा प्रमाणात नागरीकीकरण झाले आहे. तेथे विकासकामांच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करुन द्यावयाच्या असतात. अखिलेश पार्कमध्ये अशा कोणत्याच सुविधा दिल्या नाहीत. त्यामुळे नगरपालिकेला ही सर्व कामे करावी लागत आहेत. यासाठी पालिका 80 लाख रु. खर्च करीत आहे. नजीकच्या काळात पुढील कामासाठी 1 कोटींचा निधी उपलब्ध करुन देणार असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

   येथील नव्याने विकसित होत असलेल्या अखिलेश पार्कातील सर्व रस्त्यांचे खडीकरण, गटर्स व हरित पट्टा मौलाली माळ या कामांचा भूमिपूजन समारंभ आमदार हसन मुश्रीफ व नगराध्यक्षा माणिक माळी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार सतेज पाटील यांचे प्रतिनिधी ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

  आमदार हसन मुश्रीफ यांनी गेल्या 15 वर्षात कागल शहरात केलेल्या विकासकामांचा आढावा घेत वैशिष्टय़पूर्ण विकासकामे करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यासाठी सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. पाण्याच्या चार योजना करणारी कागल पालिका ही एकमेव क वर्ग नगरपालिका आहे. असे सांगितले. मी गेली 35 वर्षे सकाळी 6 वाजल्यापासून जनतेच्या कामासाठी व सेवेसाठी उपलब्ध असतो. अभिमान वाटावा अशी कामगिरी आपण केली आहे. काही माणसे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली आहेत. मिशन 2019 ची तयारी सुरु आहे. मात्र मीच मिशन 2019 फत्ते करणार असे ठामपणे त्यांनी सांगितले.

  जिल्हा बँकेचे संचालक भैया माने म्हणाले कागलचा विकास गतिमान करण्याचे काम मुश्रीफ यांनी केले आहे. मात्र त्यांचा आवाज दाबण्याचे काम काही मंडळी करीत आहेत.

  माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले चुकीची भाषणे करुन समरजितसिंह घाटगे लोकांची दिशाभूल करीत आहेत. बँकेच्या नामकरणासाठी दीड कोटी खर्च केले. बँक सभासदांची आहे. घाटगे बँकेचे मालक नाहीत. शाहू दूधसंघ बंद पडत असताना त्यांना कागल बँकेतून 5 कोटी कर्ज बेकायदेशीर दिले. यावरून घाटगे यांना बँक ठेवायची की नाही असा प्रश्न उपस्थित होतो.

   ऋतुराज पाटील, चिंदगे यांनी मनोगत व्यक्त केले. नगरसेवक सतीश घाटगे यांनी स्वागत केले. उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांनी प्रास्ताविक केले.

   कार्यक्रमास संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ, पक्ष प्रतोद नितीन दिंडे, डॉ. नवनाथ मगदूम, डॉ. विनोद आवटे, डॉ. रुकडे, चंद्रकांत गवळी, विकास पाटील, पद्मजा भालबर, अस्वले तर महिला बालकल्याण सभापती जयश्री शेवडे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते नागरीक उपस्थित होते.

Related posts: