|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चॅम्पीयन्स ट्रॉफी स्पर्धेला 4 फेबुवारी पासून सुरूवात

चॅम्पीयन्स ट्रॉफी स्पर्धेला 4 फेबुवारी पासून सुरूवात 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

ओम साई स्पोट्स रत्नागिरी व आमदार उदय सामंत पुरस्कृत चॅम्पीयन्स ट्राफी स्पर्धेचे आयोजन 4 ते 10 फेब्रुवारी 2018 या कालावधीत छत्रपती शिवाजी स्टेडीयम येथे करण्यात आले आह़े या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे. यावेळी आमदार उदय सामंत, जिल्हाधिकारी प्रदिप प़ी , जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक आदी उपस्थित राहणार असल्याची मा†िहती ओम साई स्पोट्सचे अध्यक्ष दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे. कोकणातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये गर्दीचा विक्रम या स्पर्धेने प्रस्थापित केला आह़े तब्बल 7 दिवस चालणाऱया या स्पर्धेची लोकप्रियता सर्वदूर पसरली असल्याने मुंबई, गोवा, पुणे येथून नामवंत संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत़ त्यामुळे या स्पर्धा अधीक रंगतदार होतील, असा विश्वास यावेळी पवार यांनी व्यक्त केला आह़े

यावर्षी सिमारेषेचा काही भागावर एलईडी स्क्रीनन लावण्यात येणार आहेत. या स्क्रीनवर आंतराष्ट्रीय सामन्यांप्रमाणे जाहिराती प्रसारित होणार असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आल़े स्पर्धेत सहभाग घेणाऱया प्रत्येक संघातील 14 खेळाडूंना ड्रेस किट देण्यात येणार आह़े  या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघास 2 लाख रूपये रोख व चषक, उपविजेत्यास 1 लाख रोख व चषक , तसेच मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आदी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत़ तसेच महिलांसाठी खास लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यास भावना ज्वेलर्स यांच्याकडून चांदीचे नाणे व शेवटच्या दिवशी सोन्याची नथ बक्षीस म्हणून देण्यात येणार आह़े तसेच म†िहलांसाठी प्रायोजकांकडून भरघोस बक्षीसे ठेवण्यात आली आहेत़

या स्पर्धेला आमदार उदय सामंत, उद्योजक किरण सामंत, नगराध्यक्ष राहूल पंडित, नगर परिषद प्रशासन, रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासन, जिल्हा क्रिकेट असोसिएशन, प्रायोजक यांचे यांचे या स्पर्धेला मोलाचे सहकार्य लाभल्याचे दीपक पवार यांनी यावेळी सांगितल़े