|Friday, July 19, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ‘हा’ स्मार्टफोन पडतोय यूजर्सच्या पसंतीस

‘हा’ स्मार्टफोन पडतोय यूजर्सच्या पसंतीस 

ऑनलाईन टीम / पुणे 

    सध्या बाजारात अनेक स्मार्टफोन लाँच होत आहेत. सध्प्या ‘ह्यूवाई ऑनर व्हिव 10’ हा स्मार्टफोन भारतामध्ये यूजर्सच्या पसंतीस पडताना दिसत आहे. हा स्मार्टफोन 10 नोव्हेबर 2017 मध्ये लॉच झाला असून या स्मार्टफोनच्या फिचरमूळे हा फोन वनप्लस 5टी ला टक्कर देतांना दिसत आहे.

   ‘ह्यूवाई ऑनर व्हिव 10’ मध्ये 18 : 9चे रेशोडिस्प्ले, 5.99 इंच टचस्क्रिन डिस्प्ले 1080 x 2160 पिक्सेलचा आहे. या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम तर 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरीयंटमध्ये उपलब्ध आहे. इंटरनल स्टोरेजला 256 जीबी पर्यंत एसडी कार्डने वाढवता येऊ शकते. 16 + 20 मेगापिक्सलचा डय़ुअल बॅक कॅमेरा तर फ्रंट कॅमेरा 13 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे.

ओरिओ ओएस 8.0 वर आधारीत आहे. बॅटरी मर्यादा 3750 एमएएच एवढी आहे. या फोनची किंमत 29,999 रूपये असून हा स्मार्टफोन ऍमेझॉन व store.hihonor.com वर उपलब्ध आहे.