|Thursday, December 13, 2018
You are here: Home » उद्योग » मुंबईमध्ये सर्वाधिक कॉल ड्रॉप

मुंबईमध्ये सर्वाधिक कॉल ड्रॉप 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱया मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्ये सर्वाधिक कॉल ड्रॉपच्या समस्येला तोंड द्यावे लागते. याव्यतिरिक्त बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही मोठय़ा प्रमाणात कॉल ड्रॉप होत असल्याचे सरकारी अधिकाऱयांकडून सांगण्यात आले. या भागात दूरसंचार सुविधा सुधारण्यासाठी कंपन्यांना योग्य ती पावले उचलण्यासाठी सरकारकडून सांगण्यात आल्याचे दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी सांगितले. त्यांनी दूरसंचार क्षेत्रातील प्रतिनिधींची भेट घेतल्यावर ही माहिती दिली.

तामिळनाडू, चेन्नई, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या दक्षिणेकडील भागात एकूण तक्रारींच्या तुलनेत 30 ते 33 टक्के तक्रारी करण्यात येत आहेत.

मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ही समस्या गंभीर असून याविषयी तत्काळ पावले उचलण्यासाठी कंपन्यांना सांगण्यात आले आहे. आता प्रत्येक महिन्यात कॉल ड्रॉपच्या समस्येचा आढावा घेण्यात येणार आहे. डिसेंबरपासून या क्षेत्रात गुंतवणूक करण्यात येत आहे, मात्र कॉल चालू असताना आवाज न येणे अथवा समोरचा व्यक्ती संपर्क क्षेत्रात नसल्याचे सांगण्यात येण्याचे प्रमाण अधिक आहे, असे त्यांनी म्हटले.

नवीन आर्थिक वर्षात एअरटेलने 24 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे सांगितले, तर रिलायन्स जिओ एक लाख नवीन टॉवर उभारणार असून 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल.

Related posts: