|Monday, November 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 800 दिवसांनी युवकाने थांबविले धरणे आंदोलन

800 दिवसांनी युवकाने थांबविले धरणे आंदोलन 

भावाच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी :

तिरुअनंतपुरम :

 पोलीस कोठडीत झालेल्या भावाच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी करणाऱया केरळच्या श्रीजीतने स्वतःचे धरणे आंदोलन संपुष्टात आणले. आंदोलन थांबविण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. श्रीजीत मागील 800 दिवसांपासून तिरुअनंतपुरमच्या राज्य सचिवालयासमोर धरणे आंदोलन करत होता. मागील मंगळवीर सीबीआयने प्रकरणाची चौकशी सुरू करण्यासाठी एफआयआर नेंदविला होता. सीबीआयने सर्वात अगोदर श्रीजीत आणि त्याच्या आईची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते. 

सीबीआयने एफआयआर नेंदविला असून त्याची प्रत देखील मला मिळाली आहे. जोपर्यंत प्रकरणाची निष्पक्ष चौकशी सुरू होत नाही, तोवर धरणे आंदोलन चालूच ठेवेन असे श्रीजीतने म्हटले होते. श्रीजीतने प्रारंभी दीर्घकाळ उपोषण केले होते. यामुळे त्याची प्रकृती खालावली होती.

2016 मध्ये पोलीस तक्रार प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायाधीश नारायण कुरुप यांनी श्रीजीवच्या मृत्यूला पोलीस कोठडीतील मृत्यूचे प्रकरण मानले होते. तर पोलिसांनी याला आत्महत्येचे प्रकरण ठरविले. मे 2014 मध्ये परस्सला पोलिसांनी श्रीजीवला चोरीप्रकरणी अटक केली आणि कोठडीत असताना त्याचा अनन्वित छळ झा. यादरम्यान श्रीजीवला बळजबरीने विष पाजवत त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.

अभिनेते, खासदारांचे समर्थन

मागील दोन वर्षांपासून श्रीजीतने स्वतःच्या भावासाठी आंदोलन सुरूच ठेवले. त्याच्या आंदोलनाचा मुद्दा समाजमाध्यमांवर देखील उपस्थित झाला. जेथे हॅशटॅग जस्टिस फॉर श्रीजीवच्या माध्यमातून अनेक दिग्गजांनी न्यायाची मागणी केली. यात अभिनेता निविन पॉउली, पावर्ती टीके. टोव्हिनो थॉमस, पृथ्वीराज सुकुमारन देखील सामील होते. याचबरोबर खासदार के.सी. वेणुगोपाल आणि शशी थरूर यांनी देखील याप्रकरणी गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा केली होती. राज्यसभा खासदार राजीव चंद्रशेखरन यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

Related posts: