|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शॉर्टसर्किटने साबळेवाडीत 21 एकरातील ऊस भस्मसात

शॉर्टसर्किटने साबळेवाडीत 21 एकरातील ऊस भस्मसात 

प्रतिनिधी/ वाकरे

 साबळेवाडी (ता. करवीर) येथे बुधवारी दुपारी 12 वाजता महावितरणच्या   डीपीवर विजतारांचे शॉर्टसर्किट होऊन 21 एकरातील उसाचे क्षेत्र जळून खाक झाले. दुपारी उन्हाचा कडाका व वेगाचा वारा असल्याने आगीने काही वेळात रौद्ररूप धारण केल्याने ती आटोक्मयात आणण्यासाठी शेतकऱयांना प्रयत्नांची पराका÷ा करावी लागली. यावेळी घटनास्थळी आलेल्या महावितरणच्या अधिकाऱयांना शेतकऱयांनी नुकसानभरपाई देण्यासाठी धारेवर धरले.

  घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : दोनवडे फाटा ते साबळेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर पोवारकी नावाच्या शेतातील महावितरणच्या डी.पी.वर शॉर्टसर्किटने ठिणग्या पडल्याने येथे असणाऱया उसाला आग लागली. जोराचा वारा, कडक ऊन आणि उसाची पाने वाळल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. आगीची ही घटना शेतकऱयांच्या लक्षात आल्यानंतर ती विझवण्यासाठी शेतकऱयांना यातायात करावी लागली. यावेळी चार कि.मी वर असणाऱया फुलेवाडी अग्नीशमन दलाशी फोनव्र संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ न शकल्याने शेतकऱयांनी उसाला भांगे पाडून आग आटोक्मयात आणण्यासाठी प्रयत्न केले.

   या आगीत साबळेवाडीतील पांडुरंग पाटील, हिंदूराव पाटील, संभाजी पाटील, बळवंत पाटील, अशोक पाटील, अनिल पाटील, सुरेश पाटील, संजय पाटील, मारूती पाटील, जनार्दन पाटील, विलास पाटील, कृष्णात पाटील, अमर पाटील,रणजीत पाटील,सागर पाटील, ज्ञानदेव पाटील, ऊत्तम पाटील या शेतकऱयांचे 21 एकरवरील ऊसपीक जळाले असून सव्वा कोटींचे नुकसान झाले आहे. दरम्यान कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या शेती विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व ऊस तोड सुरू केली.