|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » न्यू इंडियाला सशक्त करणारा अर्थसंकल्प : पंतप्रधान मोदी

न्यू इंडियाला सशक्त करणारा अर्थसंकल्प : पंतप्रधान मोदी 

 ऑनलाईन टीम  / नवी दिल्ली :

यंदाचा अर्थसंकल्प हा न्यू इंडियाला सशक्त करणारा अर्थसंकल्प असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केला.

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्या पार्श्वभूमीवर मोदी बोलत होते. ते म्हणाले, शेतकऱयांची स्थिती मजबूत करण्यासाठी या बजेटमध्ये ठोस पावले उचलली आहेत. अर्थसंकल्पात प्रत्येक घटकासाठी तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण भागासाठी साडे चौदा लाख कोटींची तरतूद करण्यात आली असून, या भागासाठी रोजगारही उपलब्ध होणार आहेत.

ग्रामीण जनतेचे जीवन सुकर होणार

या अर्थसंकल्पामुळे ग्रामीण जनतेचे जीवन सुकर होईल. गरीब, मध्यमवर्गीयांच्या आरोग्याच्या समस्याही दूर करण्याकरितादेखील बजेटमध्ये तरतूद करण्यात आली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.