|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जिह्याची साथ मिळत नाहीच हिच मोठी शोकांतिका…!

जिह्याची साथ मिळत नाहीच हिच मोठी शोकांतिका…! 

वार्ताहर /दहिवडी :
वर्षापूर्वी मी म्हटलो होतो एक दिवस राज्याचा व देशाचा नेता होईन आज ते करून दाखवले आहे. सातारा जिह्यावर मी आईसारखे प्रेम करतोय, मात्र मातृभूमी व कर्मभूमीतूनच मला साथ मिळत नाही. आज मला मराठवाडा, विदर्भच्या जनतेच्याने नेता बनवले. मात्र, जिह्याची साथ मिळत नाही हीच मोठी शोकांतिका असल्याची खंत पशूसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेवराव जानकर यांनी व्यक्त केली.
दहिवडी (ता. माण) येथील बाजार पटांगणावर पश्चिम महाराष्ट्र आयोजित भव्य राष्ट्रीय समाज पक्षाचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राहूल कूल, रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एस. अक्कीसागर, प्रदेश महासचिव बाळासाहेब दोलतडे, प्रदेशा उपाध्यक्ष दादासाहेब केसकर, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष ताजुद्दीन मणेर, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष श्रध्दाताई भातंबेकर, प्रदेश सचिव डॉ. उज्वलाताई हाके, राज्य कार्यकारणी सदस्य बबनदादा विरकर, भाऊसाहेब वाघ, नितीन धायगुडे, प.महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव दांडगे-पाटील, सरचिटणीस आण्णासाहेब रूपनवर, जिल्हा नियोजन सदस्य काशिनाथ शेवते, संपर्कप्रमुख खंडेराव सरक, प्रा. शिवाजीराव महानवर, डॉ.प्रमोद गावडे, पूजाताई घाडगे आदी प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरीबांधव उपस्थित होते.
महादेवराव जानकर म्हणाले, स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांचे उपकार म्हणून भाजपाने रासपला सत्तेत घेतले असून विरोधकांनी भाजपा-शिवसेना-रासपा व इतर ही युती तुटावी म्हणून पाण्यात देव घातले आहेत पण हा महादेव जानकर युती तुटून देणार नाही. बारामती व माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष कपबशीच्या चिन्हावर लढणार असून आपणही बारामती लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.