|Sunday, June 16, 2019
You are here: Home » leadingnews » एकबोटेची याचिका हायकोर्टाने फेटाळली; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

एकबोटेची याचिका हायकोर्टाने फेटाळली; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भीमा कोरेगाव हिंसाचारात कट रचल्याचा आरोप असलेल्या समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटेची गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे एकबोटेस कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

एक जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराने राज्यासह देश हादरला. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या हिंसाचारामागे समस्त हिंदू आघडीचे नेते मिलिंद एकबोटे आणि शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी यांचा हात असल्याचा आरोप करीत त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर यासंदर्भात एकबोटेने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, पुणे सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत मिलिंद एकबोटेचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर एकबोटेने उच्च न्यायालयात धाव घेतली. आपल्यावर गुन्हा दाखल करताना चुकीचे आरोप लावण्यात आल्याचे सांगत गुन्हा रद्द करण्याची मागणी एकबोटे याने याचिकेद्वारे केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे एकबोटे यास कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.