|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » प्राप्तीकर रचना गेल्यावर्षीप्रमाणेच

प्राप्तीकर रचना गेल्यावर्षीप्रमाणेच 

उत्पन्नश्रेणी, कर दर, सरचार्ज आणि सेस यांच्यात बदल नाही

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गुरूवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात प्राप्तीकर रचना गेल्यावर्षी प्रमाणेच राखली आहे. यामुळे मध्यमवर्गीय वेतनदारांची काहीप्रमाणात निराशा झाली आहे. त्यांना स्टॅन्डर्ड डिडक्शनचा काहीप्रमाणात दिलासा मिळणार आहे. शुक्रवारच्या अंकात यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात 5 टक्के कराच्या श्रेणीचा उल्लेख करण्याचे राहून गेले होते. तसेच सरचार्ज आणि सेसचाही समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे नवे कोष्टक देण्यात येत आहे.

वय वर्षे साठ पर्यंतच्या व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब

उत्पन्नश्रेणी                        करदर

रू. 2,50,000 पर्यंत                   कर नाही

रू. 2,50,000 हून अधिक ते 5,00,000    5 टक्के

रू. 5,00,000 हून अधिक ते 10,00,000    20 टक्के

रू. 10,00,000 हून अधिक                 30 टक्के

रू. 50,00,000 हून अधिक ते 1,00,00,000 उत्पन्नावरील प्राप्तीकरावर 10 टक्के सरचार्ज तसेच प्राप्तीकर आणि सरचार्ज मिळून होणाऱया रकमेवर 3 टक्के सेस.

वय वर्षे 60 हून अधिक ते 80 वर्षापर्यंत

उत्पन्नश्रेणी                           करदर

रू. 3,00,000 पर्यंत                    कर नाही

रू. 3,00,000 हून अधिक ते 5,00,000               5 टक्के

रू. 5,00,000 हून अधिक ते 10,00,000               20 टक्के

रू. 10,00,000 हून अधिक                         30 टक्के

रू. 50,00,000 हून अधिक ते 1,00,00,000 उत्पन्नावरील प्राप्तीकरावर 10 टक्के सरचार्ज तसेच प्राप्तीकर आणि सरचार्ज मिळून होणाऱया रकमेवर 3 टक्के सेस.

80 वर्षाहून अधिक वय असणाऱया व्यक्ती

उत्पन्नश्रेणी                           करदर

रू. 5,00,000 पर्यंत                           कर नाही