|Sunday, April 21, 2019
You are here: Home » क्रिडा » सौरव घोषालची 14 क्या स्थानी झेप

सौरव घोषालची 14 क्या स्थानी झेप 

 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

व्यावसायिक स्क्वॅश संघटनेने (पीएसए) शुक्रवारी जाहीर केलेल्या मानांकन यादीत भारताचा अव्वल स्क्वॅशपटू सौरव घोषालने पाच स्थानांची प्रगती करीत 14 स्थानी झेप घेतली आहे. या क्रमवारीत तोच सर्वोच्च मानांकन मिळविणारा खेळाडू आहे.

घोषालने ज्योश्ना चिन्नप्पाला याबाबतीत मागे टाकले असून चिन्नप्पाची तीन स्थानाने घसरण झाल्याने ती आता 17 व्या स्थानावर आहे. दीपिका पल्लिकल कार्तिक 20 व्या स्थानावर कायम आहे. माजी राष्ट्रीय चॅम्पियन हरिंदर पाल संधूने टॉप 50 मध्ये स्थान मिळविले असून तो आता 49 व्या क्रमांकावर आहे. अन्य भारतीयांत महेश माणगावकर व रमित टंडन यांनी 16 स्थानांची प्रगती करीत 64 वे स्थान मिळविले आहे तर विक्रम मल्होत्रा 68 व्या स्थानावर आहे. सुनयना कुरुविलाने 15 स्थानांची प्रगती करीत 89 वे असून भारतीय महिलांत ती ज्योश्ना व दीपिकानंतर तिसऱया स्थानावर आहे. याशिवाय सचिका इंगळे 96 व्या क्रमांकावर आहे.

Related posts: