|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वसंतराव खाडे यांचा नॅशनॅलिस्ट ऍवॉर्डने सन्मान

वसंतराव खाडे यांचा नॅशनॅलिस्ट ऍवॉर्डने सन्मान 

प्रतिनिधी/ वडूज

तडवळे (ता. खटाव) येथील सुपुत्र व ओगलेवाडी येथील साई इंजिनिअरिंग वर्क्सचे संचालक उद्योगपती वसंतराव दिनकर खाडे यांना पेठ इस्लामपूर (जि. सांगली) येथील आदर्श फौंडेशन सेवाभावी संस्थेच्या वतीने नॅशनल युनिटी ऍवॉर्ड हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे. कराड येथील वेणूताई चव्हाण स्मारक सभागृहात झालेल्या संस्थेच्या राष्ट्रीय एकता गौरव संमेलनात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी जेष्ठ साहित्यीक विश्वास मेहंदळे, सिने अभिनेत्री भाग्यश्री देसाई, संस्थेचे अध्यक्ष विजय लोहार, जेष्ठ पत्रकार प्रा. अशोकराव चव्हाण यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

या पुरस्काराबद्दल त्यांचे सरपंच छाया महादेव पाटील, प्राचार्य आनंदराव नांगरे, सोसायटीचे अध्यक्ष खाडे, उपाध्यक्ष साबळे, पळे, माळवे,  ओंबासे, काळे, फाळके आदिंसह परीसरातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देल्या.