|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » श्री बनशंकरी देवीची यात्रा उत्साहात

श्री बनशंकरी देवीची यात्रा उत्साहात 

प्रतिनिधी /   चिकोडी

येथील होसपेठ गल्लीतील श्री बनशंकरी देवीची यात्रा आज मोठय़ा उत्साहात पार पडली. सकाळी देवीस रुदाभिषेक करण्यात आला. तर 9 वाजता शहरातील होसपेठ गल्ली, महादेव गल्ली, दत्त गल्ली, ओतारी गल्ली, जैन पेठ, डंबळखूट, हुद्दार गल्ली, गणपत पेठ या प्रमुख मार्गावरुन वाद्यांच्या गजरात देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यानंतर महिलांद्वारे ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला.

 दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिकोडी संपादना चरमूर्ती मठाचे श्री संपादना महास्वामी यांच्या नेतृत्वात देवीस नैवेद्य दाखवून प्रार्थना करण्यात आली. या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी आस्वाद घेतला. यावेळी   बनशंकरी देवस्थान देवांग समाज ट्रस्ट कमिटीचे सर्व सदस्य व भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

हुक्केरीत बनशंकरी यात्रा महोत्सव साजरा

हुक्केरी : येथील नेकार गल्लीतील श्री बनशंकरी देवाचा यात्रा महोत्सव 2 रोजी साजरा करण्यात आला. पहाटे बनशंकरी देवीला अभिषेक घालून पूजा करण्यात आली. काकडआरती करण्यात आली. त्यानंतर महिलांच्या उपस्थितीत कुंभ व पालखी मिरवणूक सावळगी गल्ली, अडविसिद्धेश्वर मठ, संबाळ गल्लीमार्गे काढण्यात आली. यावेळी आयोजित महाप्रसादाचा अनेकांनी लाभ घेतला.

यावेळी माजी खासदार रमेश कत्ती, नगराध्यक्ष जयगौडा पाटील, उपाध्यक्ष गुरुराज कुलकर्णी, वीज संघाचे अध्यक्ष बसवराज मर्डी, पीएलडी बँक अध्यक्ष आप्पासाहेब संकण्णावर, रवि दड्डीमनी, महादेव दड्डीमनी, महादेव सुलदाळी, इराप्पा समकन्नवर, मुरगेंद्र दड्डीमनी, गुरु चिकोडी, संजवी मद्दीहळ्ळी, बसवणी दड्डीमनी, राजू कोटी, दुरदुंडी नाईक यांच्यासह भाविक उपस्थित होते.