|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलन ,तीन जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलन ,तीन जवान शहीद 

ऑनलाईन टीम / जम्मू :

जम्मू- काश्मीरच्या कुपवाडा जिह्यात नियंत्रण रेषेजवळ हिमस्खलनामुळे इक चौकी उद्धवस्त झाली. यावेळी बर्फाच्या ढिगाऱयाखाली दबून तीन जवान शहदी झाले.

संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनुसार,सकाळी आकारा वाजेच्या सुमारास माचिल सेक्टरमध्ये गस्त घालणाऱया पथकातील चार जवान हिमस्खलनामुळे बर्फाच्या ढिगाऱयाखाली दाबले गेले. त्यानंतर या चार जवानांना जवळच्या चौकीत नेण्यात आले.पण यापैकी गंभीर जखमी झालेल्या तीन जवानांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. हवलदार कमलेश सिंह (39),नायक बलवीर (38) आणि शिपाई रजिंदर (25) हे तिघेही शहीद झाले.