|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » विकासाच्या मार्गावर आसामची वाटचाल : मोदी

विकासाच्या मार्गावर आसामची वाटचाल : मोदी 

ऍक्ट ईस्ट धोरण लोकांना जोडतेय : राज्याच्या पहिल्या जीआयएसचे अनावरण

  वृत्तसंस्था / गुवाहाटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटी येथे आयोजित आसामच्या पहिल्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे (जीआयएस/ जागतिक गुंतवणूकदार परिषद) अनावरण केले आहे आसाम विकासाच्या मार्गावर वाटचाल करत असल्याचे सांगत ऍक्ट ईस्ट धोरण लोकांना जोडत असल्याचे उद्गार त्यांनी काढले. या परिषदेद्वारे राज्यात गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न सर्वानंद सोनोवाल सरकारने चालविला आहे.

इंफाळपासून गुवाहाटीपर्यंत आणि कोलकातापासून पाटण्यापर्यंत पूर्व भारत विकासाचे नवे केंद्र व्हावे. आसियान-भारत भागीदारी 25 वर्षे जुनी असली तरीही आसियानच्या सदस्य देशांसोबतचे आमचे संबंध हजारो वर्षांपूर्वीचे असल्याचे मोदी म्हणाले.

दक्षिण आशियाचे प्रवेशद्वार

आसाम सरकार ही परिषद फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (फिक्की) मदतीने आयोजित करत आहे. राज्यात कृषी आणि अन्नप्रक्रिया, सेंद्रीय शेती, बांबू, हस्तकला, वस्त्र आणि जलवाहतूक यासारख्या क्षेत्रांची ओळख पटविण्यात आली आहे.

4500 शिष्टमंडळांचा सहभाग

4500 प्रतिनिधींनी या परिषदेत सहभागी होण्यासाठी नेंदणी केली आहे. यात 16 देशांचे प्रतिनिधी सामील आहेत.  या परिषदेत केंद्रीय मंत्र्यांपैकी नितीन गडकरी, सुरेश प्रभू, रविशंकर प्रसाद, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, जितेंद्र सिंग, किरण रिजिजू सहभागी होणार आहेत. तर विदेशी पाहुण्यांमध्ये बांगलादेशचे उद्योगमंत्री अमीर हुसैन अमू, म्यानमारचे व्यापार मंत्री थान मिंट, लाओसचे पर्यटनमंत्री ओनेथाँग खोपन यांचा समावेश असणार आहे.