|Thursday, February 22, 2018
You are here: Home » मनोरंजन » नाना पाटेकर यांचा आगळावेगळा ‘आपला मानूस’

नाना पाटेकर यांचा आगळावेगळा ‘आपला मानूस’ 

वायाकॉम 18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि अजय देवगण निर्मित ‘आपला मानूस’ या मराठी चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत राहिला असून तो 2018 मधील प्रमुख आकर्षण ठरला आहे. चित्रपटामधील उत्तम कलाकार व त्याला जोड देणाऱया उत्तम कथानकामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. ‘आपला मानूस’ चित्रपटाच्या टीजरला 1.5 लाखापेक्षा जास्त व्हय़ूज मिळाले आहेत. सतीश राजवाडे दिग्दर्शित या चित्रपटात नाना पाटेकर मुख्य भूमिका साकारत असून याच्या टीजरने प्रेक्षकांचे लक्ष चांगलेच आकर्षित केले आहे.

 या ट्रेलरमध्ये शहरात राहणाऱया आणि शहरी जीवनशैलीच्या दबावाचा सामना करणाऱया राहुल आणि भक्ती गोखले या तरुण जोडप्याची कथा मांडली असून सुमित राघवन आणि ईरावती हर्षे यांनी या भूमिका साकारल्या आहेत. तसेच यात वडिलांबरोबरच्या नात्यातील गुंतागुंत सुद्धा दाखविलेली आहे. वडिलांच्या अनपेक्षित मफत्यूमुळे त्यांच्या जीवनात मारुती नागरगोजे नावाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाचा प्रवेश होतो. नाना पाटेकर यांनी ही भूमिका साकारली आहे. मारुती नागरगोजे यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे त्यांचे जग उलटेपालटे होते आणि त्यांच्या मनात जीवन व कुटुंबाविषयीच्या श्रद्धांवर प्रश्न उभे राहतात.

 नाना पाटेकर म्हणाले, नटसम्राटनंतर काहीतरी विशेष माझ्याकडे येण्यासाठी मी वाट पाहत होतो. एखादे असे पात्र जे ऐकताच क्षणी मला आवडेल आणि मारुती नागरगोजेमध्ये मला ते सापडले. ते एक क्लिष्ट पात्र आहे. मराठी चित्रपटामध्ये मी याआधी कधीच अशी भूमिका साकारली नाही. तो मितभाषी असून त्याच्या हावभाव आणि बोलण्याच्या विशिष्ट लकबीमुळे हे पात्र विलक्षण बनले आहे. वायाकॉम 18 मोशन पिक्चर्स मराठी व कलर्स मराठीचे व्यवसाय प्रमुख, निखिल साने म्हणाले, ‘मागील काही वर्षांपासून मराठी चित्रपटांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुख्यत: वैविध्यपूर्ण कथा हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या आपल्या सांस्कृतिक मूल्यांचे, साहित्याचे आणि समाजाचे प्रतिबिंब दर्शवतात. सर्वात महत्वाचे म्हणजे या चित्रपटांना मराठी प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि तो बॉक्स ऑफिसवर दिसून येत आहे. सशक्त कथानक आणि उत्तम अभिनयाची जोड असलेला ‘आपला मानूस’ हा चित्रपट आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आणतो आहे. नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक मेजवानीच ठरणार आहे. मी आशा करतो की, ‘आपला मानूस’ हा चित्रपट 2018 मधील सर्वात यशस्वी सिनेमा ठरेल. वायाकॉम 18 मोशन पिक्चर्स, अजय देवगण फिल्म्स, वॉटरगेट प्रॉडक्शन्स आणि श्री गजानन चित्र यांचा आपला मानूस 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

 

Related posts: