‘सिलिरियो’ची नवी गाडी बाजारात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
‘मारूती सुझुकी’ने सिलेरियो हॅचबॅकचे नवे टॅक्सी व्हर्जन ‘टुअर एच2’बाजारात सादर केले आहे. ‘टूअर एच 2’ही गाडी सिलेरियांच्या व्हेरिएंटवर आधारित आहे.
‘टूअर एच2’मध्ये स्पीड लिमिटींग डिव्हाईस जोडण्यात आले आहे. भारत सरकारच्या नियमांनुसार, टॅक्सीमध्ये हे डिव्हाईस लावणे अनिवार्य आहे. रस्ते अपघात टाळण्याच्या दृष्टीने सरकारने हे पाऊल उचलले आहे. या गाडीचा टॉप स्पीड 80 किलोमीटर प्रति तास असून यामध्ये 1.0लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. इंजिन 68 हॉसपावर आमि 90 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करू शकते. या गाडीची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत 4.21 लाख रूपये आहे.
Related posts:
Posted in: Automobiles
Tags: celerio