|Friday, March 22, 2019
You are here: Home » उद्योग » बाजारात घसरण कायम

बाजारात घसरण कायम 

बीएसईचा सेन्सेक्स 309, एनएसईचा निफ्टी 94 अंशाने घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

भांडवली बाजारात घसरण होण्याचे सत्र नवीन सप्ताहातही सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून कमजोर संकेत मिळाल्याने बाजारात घसरण झाली. मात्र दिवसातील खालच्या पातळीवरून बाजारात चांगली रिकव्हरी दिसून आली. दिवसातील व्यवहारादरम्यान निफ्टी 10,586 आणि सेन्सेक्स 34,520 पर्यंत घसरला होता.

बीएसईचा सेन्सेक्स 309 अंशाने घसरत 34,757 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 94 अंशाच्या कमजोरीने 10,666 वर स्थिरावला. बँक निफ्टी 1.3 टक्क्यांनी उतरत 26,099 वर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात खालच्या पातळीवरून रिकव्हरी आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.1 टक्क्यांनी घसरत 16,559 वर बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.2 टक्क्यांनी कमजोर होत 19,721 वर बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.4 टक्क्यांनी उतरत 17,782 वर स्थिरावला.

बँकिंग, अर्थवित्त सेवा, आयटी, धातू आणि भांडवली वस्तू समभागात विक्रीमुळे दबाव आला होता. निफ्टीचा अर्थवित्त सेवा निर्देशांक 1.9 टक्के, आयटी निर्देशांक 0.4 टक्के, धातू निर्देशांक 0.5 टक्क्यांनी घसरले. वाहन, औषध, पीएसयू बँक आणि ऊर्जा समभागात चांगली खरेदी झाली.

दिग्गज समभागांची कामगिरी

भारती एअरटेल, टाटा मोटर्स, टाटा मोटर्स डीव्हीआर, एचपीसीएल, बॉश, पॉवरग्रिड, भेल, आयटीसी 4.25-1.5 टक्क्यांनी वधारले. एचडीएफसी, एल ऍण्ड टी, इन्डसइंड बँक, अदानी पोर्ट्स, कोटक महिंद्रा बँक, बजाज ऑटो 4.25-2.1 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात अशोक लेलँड, युनायटेड बुअरीज, इंडियन हॉटेल्स, जीएमआर इन्फ्रा, रिलायन्स कॅपिटल 5.9-4.4 टक्क्यांनी वधारले. अजंता फार्मा, ओबेरॉय रियल्टी, गोदरेज इन्डस्ट्रीज, पेज इन्डस्ट्रीज, मॅरिको 5.1-3.1 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात बॉम्बे डाईंग, पीसी ज्वेलर, इंटेलेक्ट डिझाईन, ज्युबिलेंट लाईफ, पोलारिस 16-9.25 टक्क्यांनी वधारले. वक्रांगी, स्टर्लाईट टेक, श्री पुष्कर केमिकल्स, फोर्टिस हेल्थ, मोतीलाल ओसवाल 10-6.2 टक्क्यांनी घसरले.

Related posts: