|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंगणेवाडी यात्रा साडेसात लाखाचे उत्पन्न

आंगणेवाडी यात्रा साडेसात लाखाचे उत्पन्न 

प्रतिनिधी / कुडाळ:

आंगणेवाडी यात्रेतून कुडाळ एसटी आगाराला सात लाख 63 हजार 786 रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती कुडाळ एसटी आगाराने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे. आंगणेवाडी यात्रा कालावधीत 26 एसटी बसचे नियोजन करण्यात आले होते. कुडाळकट्टा आंगणेवाडी तसेच कसालखोटले, वायंगवडेआंगणेवाडीकसाल, हिवाळे, निरुखे, पणदूर, ओरोस, आंगणेवाडी या मार्गावर प्रवाशांच्या मागणीनुसार बसेस सोडण्यात आल्या होत्या. गतवर्षीपेक्षा यावर्षी एक लाख 37 हजार रुपये उत्पन्नात वाढ झाली आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.

Related posts: