|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » झुणका भाकर केंद्रातील हालचालीमुळे प्रशासनाची तारांबळ

झुणका भाकर केंद्रातील हालचालीमुळे प्रशासनाची तारांबळ 

प्रतिनिधी/सातारा

न्यायालयाच्या आदेशानंतर महसूल प्रशासन आणि एसटी प्रशासनाने सातारा बसस्थानकातील असलेले अतिक्रमीत झुणका भाकर केंद्राचा ‘सातारी पाहुणचार’ घेतला होता. परंतु त्याच जागेवर तथाकथीत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी अचानक जुळवाजुवळ करुन मंडप टाकण्याचा प्रयत्न करण्यास सुरवात केल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली. होत असलेल्या अतिक्रमणाबाबत लगेच सातारा पोलिसांनी त्या ठिकाणी हजर झाले. मात्र, एसटीच्या अधिकाऱयांच्या काळजात धस्स झाले. सायंकाळी उशीरा बसस्थानकात पोलीस बंदोबस्त असल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.

न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बसस्थानकातील झुणका भाकर केंद्राचे अतिक्रमण हटवण्यात आले. त्यावरुन एक सामाजिक कार्यकर्त्या अन तिच्या महिला कार्यकर्त्यां व एसटीच्या तात्कालिन आगारप्रमुख नीलम गिरी यांच्यात शाब्दीक चकमक झाली. त्यावेळी केलेल्या धाडसामुळे गिरी यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हाही दाखल झाल्याची खंत आजही एसटीच्या कर्मचारी व अधिकारी यांच्यात आहे. सोमवारी दुपारी त्याच संस्थेचे काही कार्यकर्ते तेथे जमून मंडपाचा छत बाधून बोर्ड लावत होते. त्यांच्या हालचालीवरुन पुन्हा अतिक्रमण करत असल्याची माहिती मिळताच सातारा पोलीस दल वातावरण तणावपूर्ण होवू नये म्हणून उपस्थित राहिले. पोलिसांना त्या कार्यकर्त्यांनी आमचे शिबिर असल्याचे सांगून पोलिसांच्या डोळय़ात धुळ फेकण्याचे काम केले. तर सातारा आगारप्रमुख कोळी यांनाही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सातारा पोलीस दलाला तशी माहिती दिली. दुपारी या प्रकारामुळे प्रशासन वेठीला धरल्याची जोरदार चर्चा सुरु होती.