|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘जनमत कौलाचे’ श्रेय एकटय़ाला नको

‘जनमत कौलाचे’ श्रेय एकटय़ाला नको 

नारायण गावस / पणजी

 सध्या जॅक सिक्वेरा यांचा पुतळा विधान सभेत उभारावा यासाठी कॉंग्रेस तसेच गोवा फॉरवर्ड सर्वेसर्वा विजय सरदेसाई व भाजपचे आमदार व उपसभापती मायकल लोबा यांनी मागणी केली आहे. पण यांना जनमत कौलाचा खरा इतिहास माहित नसून जनमत कौल कुणा एकाव्यक्तीमुळे विजयी झाला नसून याचे श्रेय अनेक जाणांना जात आहे, असे यावेळी जेष्ट कोंकणी साहित्यिक व जनमत कौलावेळी काम केलेले व अनुभव घेतलेले ऍड. उदय भेंबे यांनी सांगितले.

 ‘अस्मिताय प्रतिष्ठापना’ या संस्थेने जनमत कौलामागचे सत्य घटना या विषयावर त्यांचै व्याख्यान मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित केले होते यावेळी ते बोलत होते.  

 आज जनमत कौलाला 51 वर्षे होत आली आहे पण अजून याषियचे सत्य लोकांना माहित नाही. 1967 साली जनमत कौल झाला तरी त्याची खरी चळवळ ही 1940 पासून गोव्यात सुरु झाली होती. ‘महाराष्ट्रातील संयुक्त महाराष्ट्र सभेने त्याकाळी महाराष्ट्रात एका साहित्य संमेलनात गौव्याची भाषा मराठी व्हावी व गोवा महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे हा ठराव घेतला होता. त्यांना गौव्यातील काही लोक जे मुंबईला राहत होते त्यांन्यांही याला पाठींबा दिला. 1961 साली गोवा स्वातंत्र्य झाला पण 1963-64- व 65 या वर्षामध्ये मोठय़ा घडामोडी घडल्या. 1963 साली गोव्याला केंद शासीत प्रदेशाचा दर्जा मिळाला गोवा, दमन व दीव हे पेंद शासित प्रशेद झाले. त्यावेळी विधानसभा नव्हती किंवा मंत्री नव्हते त्यामुळे राज्यपालांना सर्व अधिकार होते. त्यानंतर विधासभा घेण्याचा निर्णय केंद सरकारने घेतला. त्यामुळे मे 1963 साली महाराष्ट्र गोमंतक पक्ष स्थापन झाला. त्याचवर्षी सप्टेंबर महिन्यात ‘युनायटेड  गोवन’ हा पक्ष स्थापन झाला. त्याचे अध्यक्ष डॉ. अल्बर्क होते. त्याचकाळी गोव्यात पंतप्रधान नेहरु गोवा भेटीस आले होते. पण 1940 वर्षापासून असलेली गोवा विलीनीकराणाची मागणी महाराष्ट्र गोमंतक पक्षाने धरुन ठेवली. युनायटेड गोवनने याला विरोध केला. त्याचप्रामणे गोवा महाराष्ट्रात विलीनीकरण होऊ नये यासाठी मडगांवात ‘राष्ट्रमत’ या दैनिकाच स्थापना झाली हे दैनिक मराठी असले तरी गोवा महाराष्ट्रात विलीनीकरण करण्यात याचा विरोध होता. त्याचप्रमाणे कॉंग्रेस, कलापथक व संघप्रदेश या संघानी गोवा विलीनीकरणास विरोध केला. आल्बर्क यांनी जॅक सिक्वेरा यांना युनायटेड गोवनचे अध्यक्ष केले.

7 डिसेंबर रोजी पहिली निवडणूक

7 डिसेंबर 1963 साली गौव्यात पहिली निवडणूक झाली यात महाराष्ट्र गोमंतक  पक्षाला 16 जागा मिळाल्या तर युनायटेड गोवनला 12 जागा मिळाल्या. एमजीपीला प्रजासमाजवादीचा पाठींबा होता. त्यांचे दोन उमेदवार होते त्यामुळे एमजीपीचे 14 व त्यांचे दोन मिळून 16 तर दमन 1 व दीवचा 1 एकुण 30 आमदार त्यावेळी निवडून आले होते. त्यामुळे विलीनीकरणाच्या मागणीला जोर वाढला. 7 एप्रिल 1964 साली  पंतप्रधान नेहरु यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली व अगोदर 10 वर्षे  विकास करावा नंतर लोकांच्या इच्छेनुसार विलीनकरणाचा निर्णय घ्यावा असे सांगण्यात आले. नंतर नेहरु निवर्तले व लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. पुरुषोत्तम काकोडकर त्याकाळी गोवा कॉंग्रेस प्रदेशाचे अध्यक्ष होते. त्यांनी विलीनीकरणाचा विरोध केलो होता. पण गोव्यात यवेळी कॉंग्रेसचा एकही आमदार निवडून आला नव्हता पण मते मिळाली होती.  शास्त्राrच्या अध्यक्षतेखाली गोव्यात विलीनीकरणासाठी पुन्हा गोव्यात निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. त्याचकाळी भारत चीन व पाक यांच्यामध्ये युद्ध सुरु होते त्यामुळे शास्त्राrना याकडे लक्ष देता आले नाही. शास्त्राrही निवर्तले हा निर्णय तसाच  राहीला इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या व मुरारजी भाई उपपंतप्रधान झाले. महाराष्ट्र  मंख्यमंत्र्याकडून गोवा विलीकरणासाठी दबाव वाढले. 1966 साली पुरुषोत्तम  काकोडकर यांनी इंदिरा गांधीं व मुरारजीना भेटले व निवडणूक घेणे हे योग्य नाही, त्यासाठी काही तरी दुसरा निर्णय घ्यावा, असे सांगितले पण त्यांनी त्यांचे ऐंकुन घेतले  sनाही. शेवटी ते महराष्ट्रातील एक नेते व काँग्रेसचे केंदीय नेते सखा पाटील यांना भेटले त्यांच्याकडे शास्त्राrजी यांच्या मंत्रीमंडळाचा पुन्हा निवडणूकाचा निणर्य रद्द करण्याची मागणी केली. त्याचवेळी सखा पाटील यांनी पुन्हा मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा ठराव मांडला व तो मान्य करण्यात आला. त्यामुळे गोवा महाराष्ट्र विलीनीकरणासाठी  पुन्हा निवडणूक न घेता दुसरा पर्याय सुचविण्याची मागणी केली. याच वेळी त्याकाळचे  sगृह सचिव एल. पी. सिंग यांनी ‘जनमत कौल’ हा विषय सुचविला

 त्यानंतर 16 जानेवारी 1966 साली गोव्यात ‘जनमत कौल’ झाले यात एमजीपीचे गुलाबाचे फुल व युनायटेड गोवाचे दोन पाने हे दोनच चिन्हे होते. त्यामुळे 34 हजार 21 इतक्या मतांनी गोवा महराष्ट्रात विलीनीकरण्याचा विरोधात मते जास्त पडली व गोव्याला वेगळय़ा राज्याचा दर्जा मिळाला. यात युनायटेड गोवन प्रमाणे राष्ट्रमत, कॉंग्रेस, कलापथक, संघप्रदेश या घटकांचा वाटाही मोठा होता. जॅक सिक्वेरा यांना त्यावैळी जास्त मेहनत घ्यावी लागली नाही कारण त्याकाळी 35 टक्के ख्रिश्चन गौव्यात होते त्यांचा गोवा विलीनीकरणास 100 टक्के विरोध होता. पण त्यात हिंदूची 16 टक्के sमते मिळाली म्हणून जनमत कौल जिंकता आला.

 त्यानंतर पुन्हा निवडणूक झाली  पुन्हा गोमंतक महाराष्ट्र पक्षाला 16 जागा मिळाल्या व युनायटेड गोवन पक्षाला 12 जागा मिळाल्या व गोव्याचे मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर झाले. काही लोक गोवा महाराष्ट्रात विलीनीरकणास भाऊसाहेबांना दोषी करत आहे. निवडणूकीच्या वेळी आम्ही भाऊसाहेबांना भेटण्यात गेले होतो. यावेळी rभऊसाहेबांना आम्ही पटवून दिली गोव्याचे जर महाराष्ट्रात विलीनीकरण झाले तर गोव्याला कसलाच दर्जा मिळणार नाही व गोवा महाराष्ट्राचा एक जिल्हा म्हणून  ओळखला जाणार पण गोव्याच्या लोकांना भाऊसाहेब हे मुख्यमंत्री हवे होते जर  महाराष्ट्रात विलीनीकरण  झाले तर ही संधी मिळणार नाही भाऊसाहेबांना हे पटले व नंतर लोकांच्या इच्छेनुसार भाऊसाहेब बांदोडकर हे मुख्यमंत्री झाले. जनमत कौलामुळे आज गोव्याला कोकणी राष्ट्र भाषेचा दर्जा मिळाला तसाच वेगळ राज्य दर्जा मिळाला. जन कौलाचा इतिहास गौव्यासाठी खूप मोठा आहे. यात राजकरण्यांनी लोकांना खोटा इतिहास सांगु नये असेही यावेळी उदय भेंब्रे यांनी जनमत कौलाचे सत्य लोकांसमोर आणले.

Related posts: