|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जानेवारीत अपघाती मृत्यूच्या संख्येत घट

जानेवारीत अपघाती मृत्यूच्या संख्येत घट 

प्रतिनिधी/ पणजी

दरवर्षी कमीतकमी 300 हून अधिक व्यक्ती अपघाताने मृत होतात तर यावर्षी हा आकडा कमी करून 200 पर्यंत आणण्यात येईल. हेल्मेट नसल्यास अडवले की चालक आपण मंत्री, आमदारांना ओळखत असल्याचे सांगून त्यांना फ्ढाsन लावतात व पोलिसांकडे बोलायला सांगतात. अशावेळी पोलिसांनी नम्रपणे बोलावे. नंतर चालकाला नम्रपणे चलन द्यावे. जानेवारी महिन्यात 4 टक्के अपघातांची तर 20 टक्के त्यातून होत असलेल्या मृत्यूच्या संख्येत घट झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले.

वाहतूक संचालनालय गोवा सरकार आयोजित ‘अतिवेगाने गाडी चालविणे, आपत्तीला स्वतःहून बोलावणे’ या 8 व्या राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह 2018 च्या उद्घाटन प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी वाहतूक मंत्री सदिन ढवळीकर, वाहतूक संचालक निखिल देसाई, सचिव शिवप्रतापसिंह, पणजी महापौर सुरेंद्र फ्gढर्तादो, पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर, उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन, विठ्ठल चोडणकर यांची उपस्थिती होती.

हा सप्ताह सोमवार दि. 5 ते रविवार दि. 11 रोजीपर्यंत चालणार आहे. यावेळी सभागृहात कदंब कर्मचारी, मुष्टिफ्ंढड हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी तसेच सरकारी कर्मचारीही उपस्थित होते.

तीन महिन्यात होणार नवीन कायदा

सुदिन ढवळीकर यांनी सांगितले की, भारतात ज्यावेळी रस्ता सुरक्षा सप्ताह होतो त्याचवेळी नियम पाळले जातात, पण नंतर त्यांचा विसर होतो. येणाऱया तीन महिन्यात नवीन कायदा लागू होणार आहे. त्यानुसार हेल्मेट न घातल्यास 1000, नो पार्किंग 1000, नो एन्ट्री 1000 तर दारु पिऊन गाडी चालवल्यास पहिल्यांदा 5000 आणि दुसऱयांदा 10,000 असे चलन देण्यात येईल. गोव्यात 14 लाख गाडय़ांची संख्या असून त्यात 6 लाखाहून अधिक मोटारसायकल आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.