|Sunday, August 25, 2019
You are here: Home » मनोरंजन » पुणेकरांनी अनुभवला माधुरीचा पुणेरी बाणा

पुणेकरांनी अनुभवला माधुरीचा पुणेरी बाणा 

ऑनलाईन टीम /पुणे 

 

     पुण्याच्या प्रभात रोडवर सुरू असणाऱ्या शूटींगदरम्यान जीन्स, लाल टी -शर्ट आणि गळ्यात निळा स्कार्फ अशा वेशभूषेत ही हास्यसम्राज्ञी व्हॅनिटीतून बाहेर आली आणि तिची एक झलक पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांच्या तुडुंब उत्साहानं भारलेला तो परिसरच ‘माधुरीमय’ झाला.

     आतापर्यंतच्या फिल्मी करीअरमध्ये कधीच बाईक न चालवलेली माधुरी बकेट लिस्टच्या निमित्ताने पहिल्यांदाच सुपर बाईकवर दिसली आहे. आपल्या आयुष्याच्या एका वळणावर ही गृहिणी थेट बाईकवर स्वार होते…यामागे नेमकं काय गोम आहे, हे चित्रपट पाहिल्यावर आपल्याला कळणारच आहे, पण यानिमित्ताने पुण्यात अवरलेल्या या अप्सरेला पाहून पुणेकर मात्र सुखावले आहेत. चित्रपटाच्या शूटींगसाठी पुण्यात अवतरलेली ही अप्सरा आपल्या आठवणींमध्ये चांगलीच रमली. याविषयी सांगताना आपल्या भावंडांबरोबर पुण्यात धमाल उडवून दिल्याचं ती म्हणाली. याविषीयी पुढे बोलताना, “पर्वती, शिंदेछत्री अशा पुण्यातल्या कितीतरी ऐतिहासिक ठिकाणांना भेटी दिल्या. आम्ही भावंड इथं वेड्यासारखे भटकलोय आणि चिंचा, बोरं, करवंदांवरही ताव मारला” असं ती म्हणाली.

पुण्याच्या साने कुटुंबातील गृहिणीच्या भूमिकेत माधुरी आपल्याला दिसणार असून एकाचवेळी बऱ्याच भूमिका सक्षमपणे पार पाडणाऱ्या गृहिणींचं प्रतिनिधित्त्व ही हास्यवदना करते आहे. आपल्या या भूमिकेसाठी पुणेकरांचा हजरजबाबीपणा आणि टोमणेदार विनोदी बोलणं आपण आत्मसात केल्याचंही तिने म्हटलं आहे.