|Friday, February 22, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » देशातील पहिला इन्व्हर्टर विंडो एसी लवकरच बाजारात

देशातील पहिला इन्व्हर्टर विंडो एसी लवकरच बाजारात 

ऑलाईन टीम / पुणे :

वोल्टास लि. या भारतातील प्रथम क्रमांकाच्या वातानुकूलित यंत्रांच्या ब्रॅण्डने डीसी इन्व्हर्टर तंत्रज्ञान वापरलेला भारतातील पहिलाच विंडो एअर कण्डीशनर सादर केला आहे.

अत्यंत वैशिष्टय़पूर्ण अशा स्टेडी कूल इन्व्हर्टर कॉम्प्रेसरवर हे वातानुकूलित यंत्र चालत असून या कॉम्प्रेसरचा वेग बदलता येतो, तर कूलिंगची तीव्रता आणि सेव्हिंग स्थिर राहते. या उत्पादनात इन्स्टंट कुलिंग मोडही देण्यात आला असून हवेतील चिकटपणा आणि उष्णता वाढवणारी आर्द्रता कमी करण्यासाठी सक्रिय डीहय़ुमिडिफायरही देण्यात आले. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, ग्राहकांना मोफत इन्स्टॉलेशन सेवा देण्यात येणार आहे. यासाठी बुकिंग 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले आहे.

याबाबत बोलताना वोल्टास लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप बक्षी म्हणाले, ‘वातानुकूलित यंत्रांच्या क्षेत्रातील नवनवीन संशोधनात वोल्टास कंपनीचा नेहमीच प्रथम क्रमांक असतो. भारतीय बाजारपेठेतील ग्राहकांच्या वाढत्या मागण्या लक्षात घेऊन त्यांना आधुनिक तंत्रज्ञान किफायतशीर किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी हे वैशिष्टय़पूर्ण उत्पादन सादर करण्यात आले आहे.’

 

Related posts: