|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » उद्योग » 2017 मध्ये देशात सोन्याच्या आयातीमध्ये वाढ

2017 मध्ये देशात सोन्याच्या आयातीमध्ये वाढ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2017 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या मागणीत घसरण नोंदविण्यात आली, मात्र भारतात 9 टक्क्यांनी मागणी वाढल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने म्हटले. ग्रामीण भागातून वाढती मागणी, देशातील सकारात्मक आर्थिक वातावरण, धनत्रयोदशी वेळी सोन्याच्या किमती कमी असल्याने देशातील मागणीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले. 2009 नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवरील मागणी सर्वात खालच्या पातळीवर पोहोचली असून गुंतवणुकीतून मिळणारा परतावा कमी असल्याने मागणीत घट होत आहे.

2017 मध्ये देशात सोन्याच्या मागणीत 9.1 टक्क्यांनी वाढ होत 727 टनावर पोहोचली आहे. सोन्याच्या दागिन्यांमध्ये 12 टक्क्यांनी वाढ होत 562.7 टन विक्री करण्यात आली. किमतीच्या बाबतीत दागिन्यांची मागणी 9 टक्क्यांनी वाढत 1,48,100 कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली. जीएसटी स्थिर, शेअर बाजारातून चांगला परतावा आणि जीडीपी वाढीमुळे अर्थव्यवस्थेत वाढ होत असल्याने देशात सोन्याच्या मागणीत वाढ झाली. नोटाबंदीनंतरचा असणारा परिणाम घटला आहे. याव्यतिरिक्त सराफांवरील ऍन्टी मनी लॉन्डरिंग कायदा वगळण्यात आल्याने मागणीत वाढ झाली.

गेल्या काही महिन्यांत सोन्याचे दर स्थिर आहेत. 2018-19 च्या अर्थसंकल्पात सोन्यासाठी सकारात्मक संकेत मिळाले आहेत. 2018 मध्ये सोन्याची मागणी वाढत 700 ते 800 टनापर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्यामध्ये करण्यात येणारी गुंतवणूक तीन चर्तुंथांसने घसरली आहे.

Related posts: