|Saturday, May 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गुंडांची यादी प्रसिद्ध करणार!

गुंडांची यादी प्रसिद्ध करणार! 

मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती : निष्पापांची नावे वगळणारर

प्रतिनिधी / बेंगळूर

राज्यातील गुंडांच्या यादीमध्ये भाजपमधील काही जणांचा समावेश असावा, असा टोमणा हाणत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुंडांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल, तसेच निष्पाप असणाऱयांची नावे वगळण्यात येतील, अशी घोषणा केली.

विधानसभेत प्रश्नोत्तर चर्चेवेळी भाजप आमदार यु. बी. बनकार यांच्यावतीने आमदार सुनलिकुमार यांनी विचारलेल्या प्रश्नावरून सभागृहात वादावादी झाली. हीच संधी साधत मुख्यमंत्र्यांनी भाजप आमदारांवर शरसंधान साधले.

पोलीस खात्याच्या नियमानुसार असभ्यवर्तन, फसवणूक, अर्वाच्च्य शब्दप्रयोग, शांततेला बाधा पोहोचविणे, दरोडे, खंडणी वसुली, महिलांचा छळ आदी प्रकरणांत सहभागी असणाऱयांचा समावेश गुंडांच्या यादीमध्ये केला जात आहे, अशी माहिती सिद्धरामय्या यांनी दिली.

याप्रसंगी बोलताना सभाध्यक्ष के. बी. कोळीवाड यांनी, आपल्या मतदारसंघात 320 हून अधिक निष्पापांची गुंडांच्या यादीत नावे घुसडण्यात आली आहेत, असा आक्षेप घेतला. त्यावेळी भाजप आमदार सुनिलकुमार यांनी, एका विशिष्ट संघटनेतील कर्मचाऱयांना टार्गेत करण्यात येत आहे. असा आरोप केला. यावेळी विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनीही सुनलिकुमार यांना पाठिंबा दिला.

त्यावेळी मध्येच हस्तक्षेप करून गृहमंत्री रामलिंगारेड्डी यांनी, मागील सरकारने गुंडांची यादी प्रसिद्ध केलेली नाही, असे सांगितले. त्याचवेळी मंत्री. के.जे. जॉर्ज यांनी भाजप नेते गुंडांविषयी अधिक काळजी करीत आहेत, असा आरोप केला. भाजप नेते निवडणूक काळात गुंडांची यादी मागत आहे. त्यांचा वापर ते निवडणुकीत करणार आहेत का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे भाजप आमदार भडकले. त्यामुळे सभागृहात गोंधळ माजला. आरोप-प्रत्यारोपांमुळे सभागृहात शांत राहण्याचे आवाहन सभाध्यक्षांनी केले.

त्यानंतर सिद्धरामय्या यांनी भाजप आमदार गुंडांची बाजू घेत आहेत. त्यामुळे गुंडांच्या यादीमध्ये भाजपमधील काहीजण असावेत. त्याशिवाय तुम्ही त्यांची बाजू घेतली नसती, अशा शब्दात खडसावले. त्यानंतर जगदीश शेट्टर यांनी, सरकार पोलीस खात्याचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप केला.

 

Related posts: