|Friday, November 16, 2018
You are here: Home » क्रिडा » नादालचे मेक्सिको स्पर्धेतून पुनरागमन

नादालचे मेक्सिको स्पर्धेतून पुनरागमन 

वृत्तसंस्था / बार्सिलोना

चालू महिन्याच्या अखेरीस स्पेनचा टॉप सीडेड टेनिसपटू राफेल नादालचे टेनिस क्षेत्रातील पुनरागमन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नादालला गेल्या महिन्यातील ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात खेळताना हाताच्या तळव्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे नादालला या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते.

आता 26 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया ऍकापुल्को मेक्सिको खुल्या टेनिस स्पर्धेत नादाल पुनरागमन करणार आहे. नादालची दुखापत आता बरी होण्याच्या मार्गावर आहे. 31 वर्षीय नादालला 2017 सालातील सर्वोत्तम क्रीडापटूचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कार वितरण समारंभावेळी नादालने टेनिसमधील आपले पुनरागमन लवकरच होणार असल्याचे सांगितले. नादालने मेक्सिकोतील स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली नाही. तसेच याच कालावधीत स्वित्झर्लंडच्या फेडररने दुबई खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले तर नादालला आपले अग्रस्थान गमवावे लागेल आणि फेडरर ताज्या मानांकन यादीत पहिल्या स्थानावर झेप घेईल. फेडररने गेल्या महिन्यात सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळविले आहे.

Related posts: