|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » नेमार सर्वात महागडा फुटबॉलपटू

नेमार सर्वात महागडा फुटबॉलपटू 

वृत्तसंस्था/ पॅरीस

प्रेंच लीग फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱया पॅरीस सेंट जर्मन (पीएसजी) संघाने आपल्या 13 फुटबॉलपटूंचे वेतन जाहीर केले आहे. यामध्ये नेमार हा सर्वात महागडा फुटबॉलपटू ठरला आहे. पीएसजी क्लबतर्फे नेमारला मासिक 3.07 दशलक्ष युरोस (3.8 दशलक्ष डॉलर्स) वेतन दिले जाणार आहे.

या वेतनश्रेणीमध्ये नेमारनंतर उरूग्वेचा कॅव्हेनी दुसऱया स्थानावर असून त्याला मासिक 1.54 दशलक्ष युरोसचे वेतन मिळणार आहे. फ्रान्सचा मिबापे तिसऱया स्थानावर असून त्याला 1.5 दशलक्ष युरोसचे वेतन मिळणार आहे. ब्राझीलचा थियागो सिल्वा चौथ्या स्थानावर असून त्याला 1.33 दशलक्ष युरोसचे वेतन दिले जाणार आहे.