|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » उंडीर येथे सांडपाणी प्रकल्प उभारु नये

उंडीर येथे सांडपाणी प्रकल्प उभारु नये 

प्रतिनिधी/ पणजी

 फोंडा तालुक्यातील बांदोडा उंडीर येथे उभारण्यात येणाऱया सांडपाणी प्रक्रीया प्रकल्पाला उंडीरवासियांचा विरोध असून तो त्या जागोवरी दुसऱया जागावर न्यावा, अशी मागणी या गावातील लोकांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर लोकांना अंधारात ठेवून हा प्रकल्प या ठिकाणी करायला उठले आहे. असा आरोप यावेळी उंडीर पर्यावरण संरक्षण मंचचे अध्यक्ष गुरुदास नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत केला आहे.

 मंत्री सुदीन ढवळीकर यांच्याकडे सांडपाणी साधनसुविधा विकास महामंडण याचा ताबा आहे. त्यचा दुरुउपयोक करुन त्यांनी लोकांच्या विरोधात उंडीर येथे हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय  घेतला आहे. हा प्रकल्प झाला तर या ठिकणी असलेली खारफुटीचे झाडे नष्ट होणार तसेच जवळच मंदिर व चर्च आहे. याचा त्यांना त्रास होणार आहे. हा प्रकल्प बेकायदेशिरआहे. ढवळीकरांनी या महामंडळाकडून  व पंचायतीकडून बनावट ना हरकत दाखल घेतला आहे. या विषयी आम्ही न्यालयात याचिका  दाखल केली आहे असेही यावेळी गरुदास नाईक म्हणाले.

 ढवळीकर हे उंडीरवासियांना कमी लेखत आहे त्यांना हवे तसे ते वागत आहे. लोकांचे विचार ऐकूत घेत नाही. गोवा किनारी विभागा व्यवस्थापन प्राधिकरणाकडून खोटा दाखला घेतला आहे. ढवळीकर आपल्या सत्तेचा गैरफायदा घेऊन या ठिकाणी हा प्रकल्प लादण्यात पाहत आहे पण उंडीरवासिय लोक त्यांना हा प्रकल्प घालायला देणार नाही, असे यावेळी ऍड. सुरेल तिळवे यांनी सांतिगले. यावेळी उंडीर गावातील अन्य सदस्य उपस्थित होते.