|Thursday, September 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » स्वातंत्र्य सैनिक सिंधुताई भुस्कुटे यांचे निधन

स्वातंत्र्य सैनिक सिंधुताई भुस्कुटे यांचे निधन 

प्रतिनिधी /चिपळूण

स्वातंत्र्य सैनिक सिंधुताई विठ्ठल भुस्कुटे यांचे (86) मंगळवारी निधन झाले. हैद्राबाद येथील मुक्ती संग्रामातील पहिल्या तरूण महिला सत्याग्रही त्या होत्या. आपल्या सामाजिक कार्यामुळे डोंबिवलीत अपक्ष नगरसेविका म्हणून त्या निवडून आल्या होत्या. अजातशत्रू म्हणून त्यांची ख्याती होती. सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांमध्ये त्या लोकप्रिय होत्या. डोंबिवलीतील महिला व बालकल्याण क्षेत्रात कार्यरत असणाऱया मातृ मंदिर संस्थेच्या त्या संस्थापकöअध्यक्ष होत्या. सामाजिक कार्यात वयाच्या 86व्या वर्षीही तरूणाईला लाजवेल, असा उत्साह त्यांच्या ठायी होता.

Related posts: