|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » लांजा एस्टीला अपघात 5 गंभीर 14 किरकोळ जखमी

लांजा एस्टीला अपघात 5 गंभीर 14 किरकोळ जखमी 

लांजा-साटवली मार्गावरील केदारलिंग मंदीरानजीकची घटना

अवघड वळणावर तीव्र उतरात चालकाचा ताबा सुटल्याने घडला अपघात.

प्रतिनिधी /लांजा

लांजा आगाराची लांजा-इसवली एस्टी बस प्रवाशांना घेऊन इसवलीकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली. ही घटना बुधवारी दुपारी 1.15 वाजण्याच्या दरम्यान लांजा-साटवली मार्गावरील केदारलिंग मंदीरानजीकच्या तीव्र उतारावरील वळणावर घडल़ी या अपघतात बस चालक व महिला वाहकासह 5 गंभीर तर 14 किरकोळ जखमी असे एकुण 19 प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघातातील किरकोळ जखमींना साटवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक उपचार करुन सोडून देण्यात आले तर गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आह़े

या अपघातामध्ये एस्टी वाहक वर्षा वसंत कांबळे (26 ,राहणार पुनस), चालक त्र्यबंक रामराव चव्हाण (38), तर प्रवाशांमध्ये महादेव धोंडू गुरव (75,ऱा खावडी), जानकी जाणू कवचे (65,पनोरे), गीतगंगा बारक्या लाकडे (65,ऱा गावडे आंबेरे) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत़ तर सानिका संदीप कवचे (30,पनोरे), नयन विश्राम साळवी (34, इसवली), अब्दुल हमिद काझी (75, साटवली), शिवाजी गंगाराम खानविलकर (56,बेनी बुद्रुक), वसंत हरी कवचे (15,पनोरे), विजय भिकू कवचे (45,पनोरे), आबू आकबरहसन वणू (75, साटवली), जाणू रघूनाथ कवचे (68,पनोरे), संदीप देवजी धुमक( 40, बापेरे),उमेश मजिद लांबे (15, साटवली),करीष्मा तुकाराम मौर्ये (20,पनोरे), मयुरी रुपेश कदम ( 18,इसवली) हे किरकोळ जखमी झाले. यापैकी दोघांची नावे समजू शकली नाही.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, लांजा इसवली बस लांजा आगारातून नियमित सुटत़े बुधवारी लांजा एस टी आगाराचे चालक त्र्यंब्यक रामराव चव्हाण यांच्यासह महिला वाहक वर्षा वसंत कांबळे आपल्या ताब्यातील एस्टी बस क्रमांक (एम.एच 20, डी 9727) घेऊन इसवलीच्या दिशेने जात होत़े बस साटवली केदारलींग मंदिराच्या नजीक असणाऱया तीव्र उतारवरील वळणावर आली असता चालक त्र्यंब्यक चव्हाण यांचा बस वरील ताबा सुटला व बस रस्त्याच्या बाजूला जाउढन दरीत कलंडल़ी बस अचानक वाहकाच्या उजव्या बाजुला जोरदार फेकली गेल्याने बस मधील सर्व प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र रस्त्याच्या बाजुला मोठय़ाप्रमाणात झाडी असल्याने सुदैवाने बस खोल दरीत गेली नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असत़ा जखमी प्रवाशांना ग्रामस्थांच्या मदतीने एस्टी बाहेर काढण्यात आले. बसमध्ये एकुण 21 प्रवाशी होत़े यातील 19 जण जखमी झाले त्यामधील 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रत्नागिरी जिल्हा रुगणालयात हलवण्यात आले आह़े प्रसंगी लांजा ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहीका अपघातस्थळी मदतीसाठी दाखल झाल्या होत्य़ा

यावेळी एस्टी अपघात झाल्याचे कळताच एस्टीचे अधिकारी पैसे व तिकीट मशीन नेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले मात्र यावेळी अपघात जखमी झालेल्या कर्मचाऱयासह प्रवशांची साधी विचारपुसही संबंधित अधिकाऱयांकडून करण्यात आली नाही. या एस्टीच्या बेपर्वाई विरोधात लांजा पंचायत समितीचे सदस्या एस एन कांबळे यांनी नाराजी व्यक्त केल़ी एस एन कांबळे व लांजा पंचायत समिते आरोग्य विभागाचे कमलेश कामतेकर हे अपघातग्रस्तांसोबत जिल्हा रुग्णालयात उपस्थित होत़े