|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ‘व्हिवो व्ही 7 प्लस इंफीनिटी रेड’ एडिशन लॉन्च

‘व्हिवो व्ही 7 प्लस इंफीनिटी रेड’ एडिशन लॉन्च 

ऑनलाईन टीम / मुंबई

चीनमधील स्मार्टफोन निर्माता कंपनी ‘व्हिवोने’ ‘व्हिवो व्ही 7 प्लस इंफिनीटी रेड’ कलरमध्ये व्हेलेनटाईन डेच्या मुहूर्तावर लॉन्च केला आहे. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या हस्ते हे नवे स्मार्टफोन लाँच करण्यात आले.

मल्होत्रा यांनी असे म्हटले आहे की, मी व्हिवो सोबत काम करण्यास तयार आहे. आम्ही युवक व प्रेम भावना व्यक्त करणारा व्हिवो व्ही 7 प्लस हा स्मार्टफोन इंफिनीटी रेडमध्ये व्हेलेनटाईन डे च्या मुहूर्तावर लॉन्च करत आहोत.

‘व्हिवो व्ही 7 प्लस इंफिनीटी रेड कलरमध्ये s 18:9 चे प्रसर गुणोत्तरासह रेशो डिस्प्ले, 5.90 इंच टचस्क्रिन, आयपीएस डिस्प्ले 1440 X 720 पिक्सेलचा आहे. फ्रंट कॅमेरा 24 मेगापिक्सलचा सेल्फी एक्सपर्ट तर बॅक कॅमेरा 16 मेगापिक्सलचा असून यात फेस ब्युटी मोड 7.0 टेक्नॉलोजीचा वापर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम तर 64 जीबी इंटरनल स्टोरेजमध्ये उपलब्ध असून 256 जीबीपर्यंत वाढवू शकतो. अंड्रोइड ओएस 7.1 वर आधारीत स्वःताचे युजर इंटरफेस कलर ओएस 3.2 वर अवलंबून आहे. स्मार्ट स्पील्ट 3.0 स्क्रिन आहे. मोबाईलच्या मागील बाजूस फिंगरप्रींट सेंसर बसवण्यात आले आहे तर व्हेलेनटाईनच्या मुहूर्तावर हा फोन लाँच होत असल्याने हृदयाच्या आकाराची आकृती प्रिंटेड स्वरुपात काढण्यात आली आहे. बॅटरी मर्यादा 3225 एमएएच एवढी आहे. या फोनची किंमत 21,990 रूपये असून हा स्मार्टफोन ऍमेझॉन व http://shop.vivo.com वर उपलब्ध आहे.