|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » 12 कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी

12 कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी 

प्रतिनिधी /संकेश्वर :

सन 2018-19 या वर्षासाठीचा 12 कोटी 65 लाख 90 हजार रुपयांचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा धनश्री कोळेकर यांनी सादर केला. वर्षभरात शहराचा समग्र विकास करणार, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

या अर्थसंकल्पाचे वाचन करताना पालिकेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी म्हणाले, या आर्थिक वर्षात घर कर 67 लाख, पाणी कर 80 लाख 64 हजार संकलन होणार आहे. राज्य सरकारकडून 2.5 कोटी, चौथ्या वित्त आयोगाकडून 2.75 कोटीचा निधी मिळणार आहे. या निधीतून कर्मचारी वेतनासाठी 1.5 कोटी तर विद्युत खर्चापोटी 2.5 कोटी हे दोन मोठे खर्च अपेक्षित आहेत. तथापि, मिळणाऱया निधीतून शहराच्या सर्वच भागातील गटारी व रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिवषी अर्थसंकल्पातून शहराच्या 23 वॉर्डांचा दर्जेदार विकास करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. यंदा 24ƒ7 योजनेतून संपर्क रस्त्याची तोडफोड झाली आहे. यामुळे वर्षभरात नेटके रस्ते निर्माण करण्यासाठी सरकारकडून अधिकचा निधी मिळवणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्टीकरण दिले.

नगरसेवक अजित करजगी यांनी नगराध्यक्षांना दिलेल्या पत्रात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपल्या पालिका कार्यालयात साधे छायाचित्र नाही. तेव्हा येत्या बैठकीपूर्वीच मोदी यांचे छायाचित्र लावावे, अशी मागणी केली. या मागणीला उपस्थित नगरसेवकांनीही दुजोरा दिला.

Related posts: