|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » 2017 चा चिरमुले पुरस्कार पद्मभूषण राहुल बजाज यांना जाहीर

2017 चा चिरमुले पुरस्कार पद्मभूषण राहुल बजाज यांना जाहीर 

प्रतिनिधी /सातारा :

येथील युनायटेड वेस्टर्न बँकेने आपले संस्थापक विमा महर्षी वा. ग. तथा आण्णासाहेब चिरमुले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 1986 साली चिरमुले चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केली होता. या ट्रस्टमार्फत गेली 20 वर्षे बँक्ंिांढग, अर्थशास्त्र, उद्योग अशा विविध क्षेत्रात अत्युच्च कामगिरी करणाऱया व्यक्तीला चिरमुले पुरस्कार देवून गौरवण्यात येते. हा पुरस्कार मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. या पुरस्काराने यापूर्वी मनमोहन सिंग, रतन टाटा, डॉ. नारायण मुर्ती, डॉ. एस. रंगराजन, अरूण शौरी, डॉ. एकनाथ ठाकूर आदी मान्यवरांना गौरविले गेले आहे.

2017 सालासाठी हा मानाचा पुरस्कार ज्येष्ठ उद्योगपती आणि भारतीय उद्योग जगतातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या आदरणीय पदभूषण राहुल बजाज यांना जाहीर करण्यात आला आहे.

महात्मा गांधी ज्यांना आपल्या पुत्रासमान मानत, अशा जमनालाल बजाज यांच्या घराण्यात त्यांचा जन्म झाला. देशात व परदेशात उच्चशिक्षण प्राप्त केल्यानंतर त्यांनी बजाज ऑटो या आपल्या वडिलांच्या उद्योगात कार्य करण्यास सुरूवात केली. आपल्या कर्तृत्वाने ते वयाच्या केवळ 30 व्या वर्षी 1968 मध्ये बजाज ऑटोचे प्रमुख बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली कधीकाळी आलेल्या अडचणींवर मात करत कंपनीने प्रगतीची घोडदौड केली. आज बजाज ऑटो ही जगातील 4 थ्या क्रमाकांची स्कूटर, रिक्षा आणि मोटार सायकल बनवणारी बलाढय़ आणि अग्रेसर कंपनी झाली आहे. सातत्याने संशोधन करून उत्पादनाचा दर्जा सुधारणे आणि विश्वमान्यतेचा लौकिक मिळविणे हे कंपनीने साध्य केले आहे. या सगळय़ामागे राहुल बजाज यांचे कर्तृत्व आणि दूरदृष्टी आहे.