|Monday, January 21, 2019
You are here: Home » leadingnews » कर्मचाऱ्यांच्या आधीच तुकाराम मुंढे पालिकेत हजर, कर्मचाऱ्यांची पळापळ

कर्मचाऱ्यांच्या आधीच तुकाराम मुंढे पालिकेत हजर, कर्मचाऱ्यांची पळापळ 

ऑनलाईन प्रतिनिधी / नाशिक

  पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदावरून बदली केलेल्या आणि डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी नाशिक आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. बरोबर दहाच्या ठोक्याला मुंढे पालिकेत पोहचल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची धांदल उडाली.

  धडाकेबाज कार्ययद्धतीसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंढे यांची अवघ्या दहा महिन्यांत पीएमपीच्या चेअरमनपदावरून उचलबांगडी करण्यात आली.पीएमपीच्या कारभाराला शिस्त लावण्यात त्यांनी भरीव कामगिरी केली. यामुळे कर्मचाऱ्यांची त्यांच्यावर नाराजी होती. सत्ताधार्यांनाही  ते जुमानत नसल्याने त्यांच्या बदलीची चर्चा होती.

Related posts: